अनंत चतुर्दशी ; ज्ञानेश्वर माशाळकर

अनंत – चतुर्दशी !



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

ज्याक्षणी या शरीरातील श्वास संपेल
तो क्षणच अनंत – चतुर्दशी !

जेंव्हा अहम् आणि त्वम् एकजीव
होतील तीच अनंत – चतुर्दशी !

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण
बाप्पासारखा काही दिवसांचा
कोणी दीड, कोणी पाच
तर कोणी दहा दिवसांचा…

थोडा वेळ आहोत इथे
तर थोड जगुन घेऊया
बाप्पा सारखे थोडे
लाडु मोदक खाऊन घेऊया…

इथे सर्वच आहेत भक्त आणि
सगळ्यांमध्ये आहे बाप्पा
थोडा वेळ घालवू सोबत
आणि मारु थोड्या गप्पा…

मनामनातले भेद मिटतील
मिटतील सारे वाद
एक होईल माणुस
आणि साधेल सुसंवाद…

जातील निघुन सारेच
कधी ना कधी अनंताच्या प्रवासाला
ना चुकेल हा फेरा
जन्माला आलेल्या कोणाला…

बाप्पा सारखं नाचत यायचे
आणि लळा लावुन जायचे
दहा दिवसांचे पाहूणे आपण
असे समजून जगायचे…

किंमत तुमची असेलही
तुमच्या प्रियजनांना लाख
आठवणी ठेवतील जवळ
अन् विसर्जित करतील तुमची राख…

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण
दीड दिवस नाहीतर, दहा दिवसाचा
हे जगणे म्हणजे एक उत्सव

हा काळ, फक्त दोन घडींच्या सहवासाचा……

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर, थाराशिव
=========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles