भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मा. सहकारी पतसंस्थेची आमसभा गुरूवारी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मा. सहकारी पतसंस्थेची आमसभा गुरूवारी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

परभणी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पतसंस्था ही जिल्ह्यातील स्वबळावरील, स्व भांडवलाची एकमेव पतसंस्था आहे. जिल्ह्यातील शंभर टक्के कर्ज वसुली असणारी N. P. A च्या बाहेर असणारी एकमेव पतसंस्था आहे. 100% वसुली करणारी पतसंस्था असल्याने, अल्पावधीतच यावर्षी, अर्थविश्वातील सहकारातील “बेस्ट पतसंस्था ” म्हणून या पतसंस्थेला हा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

परभणी जिल्ह्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाची एकमेव पतसंस्था असून या पतसंस्थेची वाटचाल अतिशय दमदार व भरभराटीची आहे. ही पतसंस्था जिल्ह्याच्या वैभवात भर टाकणारी ही एकमेव पतसंस्था आहे. जिचे सभासद सर्व विभागाचे शासकीय, निमशासकीय कार्यालयातील सभासद होऊ शकतात. सभासदाच्या अडी अडचणीसाठी मदत करून आर्थिक साक्षरता करणे , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील पे बॅक टू द सोसायटीचे काम करण्याचे कार्य ही पतसंस्था भविष्यात करेल असे संस्थेचे चेअरमन सतीश कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

गुरूवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिवशी गुणवंत विद्यार्थी सत्कार करणे, पतसंस्थेचे सभासद असणाऱ्या सभासदातून सामाजिक, शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षक , कर्मचाऱ्यास आदर्श शिक्षकास सहकाररत्न पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. असे संस्थेचे चेअरमन सतीश कांबळे, सेक्रेटरी दीपक पंडित, सुनील शंकपाळे (उपाध्यक्ष,) कमल दवंडे (कोषाध्यक्ष) सविता रोडे (सहसचिव )विठ्ठल कांबळे (संचालक) दादाराव ताजने (संचालक )राजू कांबळे (संचालक ) विशाल प्रधान (संचालक) चंदा खंदारे (संचालक) शिवाजी टेकुळे (संचालक ) मधुकर मस्के (तज्ञ संचालक ) ad सुनील सोंदरमल, माया देवी गायकवाड, तज्ञ संचालक,यांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्याचे यावेळी आवाहन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles