बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट अकरा🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : प्रेमकिरण🥀*
*🍂बुधवार : २७/ सप्टेंबर /२०२३*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*प्रेमकिरण*

अवचित हे स्वप्न जागले
त्या स्पर्शात मी मिटले
काय घडले काही कळेना
रंगात त्याच्या मी रंगले

भूमीवरी पाऊल पडेना
मना लागले हे पिसे
भाववेड्या माझ्या मनाला
आता आवरु मी कसे

गात्रांत चैतन्य चेतले
क्षण क्षण उत्सव झाला
तोची गंध कस्तुरीचा
देह अवघा गंधाळला

फुलाफुलांत फुलूनिया
मीच आता फूल जाहले
त्याच्या अस्तित्वाच्या खुणा
जळीस्थळी शोधू लागले

निळे आभाळ पांघरूनी
ओढाळ स्पर्श शोधते
प्रेमकिरण तेची आता
अंगभरी मी लपेटते

निळ्या सावळ्याचे गारुड
माझ्या रोमरोमात भिनले
मीच सावळ्याच्या आता
शिरी मोरपीस शोभले

मना लागे निळी चाहूल
अंग अंग रोमांचले
अंतर्यामी तो झिरपत गेला
मीच कान्हा जाहले

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃✍️🍃➿➿➿➿
*प्रेमकिरण*

जेव्हा म्हणतो ना आपलं
कशाला पुरावाच हवा….
कारण न सांगता….
नात्यात आधार शोधावा

जेव्हा डोळ्यात प्रतिबिंब पाहतो
तेव्हा विचार जुळता मन जुळती
अनोळखी ना परकी पाहता
मैत्रीचा धागा बांधती….

नकळतच मनात जपतो
पाहतो त्याच्यात आपलं अस्तित्व
मर्जी …मन सांभाळत
बेदखल झालो तरी होतो व्यक्त

अपेक्षा उत्तराची करता
स्वतः लाच विचारतो प्रश्न
जेव्हा मिळत नाहीत उत्तरे
अंतरीच होतो मग्न…..

वास्तव जेव्हा येतं लक्षात
अनुभव हाच प्रेम किरण
रस्ता चुकीचा नकोत आशा
उमगते लाख मोलाची शिकवण

*सौ .सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃✍️🍃➿➿➿➿
*प्रेमकिरण*

तुझं तुझं माझं माझं करणं
मी पणा सोडू या सारा
प्रेम आपुलकीच्या स्पर्शाने
येईल आनंदाचा वारा……
हेवा ,मत्सर , राग, लोभ
यांना नसावे जीवनी स्थान
आपुलकी, प्रेम,जिव्हाळ्याने
माणुसकीचा करू सन्मान…..
पाडू या भिंत ही द्वेषाची
मध्ये आड येणारी
मनामनातून बांधूया
एक निर्मळ वाट जाणारी……
सर्वांच्या मनी प्रेमकिरणांचा
मन तृप्त करणारा वर्षाव व्हावा
मतभेद नसावा मनी
हृदयी एकोपा नांदावा……
प्रेमकिरणांनी उजळो जीवन
तिमिरातूनी तेजाकडे झेपावे मन

*सौ. स्नेहल संजय काळे*
*फलटण सातारा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃✍️🍃➿➿➿➿
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १०४ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे. कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*प्रेमकिरण*

नदीकिनारी उभी राधा
चांदन चूर्याची बरसात
बासरीचा सूर येईना
चिंता दिसे डोळ्यात

मग हळूच वळून मागे
पाऊलखुणा बसली न्याहळत
सोबतीने चाललेले पाउल
तिला होते खुणावत

कान्हा घेवू नको परीक्षा
तुझा नटखटपणा पूरे झाला
फेकीत प्रेमकिरण मोरपिसातून
अलवार पावलाने कान्हा पुढे आला

पावा वाजविली लयात
सारा आसमंत फुलून गेला
वाटते आज गोकुळात
प्रेमकिरणांचा बहार आला

लाजली वेडी राधा
गालावर चढली लाली
कृष्ण भक्तीची अन प्रेमाची
ओढ तिला लागली

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃✍️🍃➿➿➿➿
*प्रेमकिरण*

एक कळी उमलू दे सुगंधीत करण्या जनास
एक प्रेमकिरण मिळू दे तिचे सौंदर्य बहरण्यास

एक बीज रूजू दे भूकेल्या घास भरवण्यास
एक प्रेमकिरण मिळू दे त्या पिकांस वाढण्यास

एक मन फुलू दे दु:ख मनीचे हरण्यास
एक प्रेमकिरण मिळू दे त्या मनास जुळण्यास

एक आस जागवू दे आनंद नभी पेरण्यास
एक प्रेमकिरण मिळू दे आनंद तो पसरवण्यास

एक धरा बहरू दे हिरवळीने सजण्यास
एक प्रेमकिरण मिळू दे हिरवळ ती वाढण्यास

एक शाम महकू दे तारूण्य उमलवण्यास
एक प्रेमकिरण मिळू दे चेहरे प्रेमरसाने खुलवण्यास

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃✍️🍃➿➿➿➿
*प्रेमकिरण*

ठाव घेता मनाचा
काळजात बिज पेरीले
प्रेमकिरणांनी साजनाच्या
बिजांना अंकुर फुटले

मन प्रफुल्लित झाले
जेव्हा प्रेम बहरू लागले
सुखावल्या रोपांना
डोळ्यांनी पाणी दिले

होकर भरताच प्रेयसीने
घेतला प्रितमाचा मुका
आग अशी सळसळली
नाही पडणार आता सुखा

दोन जीव एकत्र आले
भिजले प्रेम पावसात
एकरुप झाले तन – मन
चोरुनी हृदय क्षणात

फळा – फुलांनी बहरुनी
सारे रान बहरून गेले
प्रेमाच्या एका ठोक्याने
मना आनंद देऊन गेले….!

*✍️ पु. ना. कोटरंगे*
ता. सावली, जि. चंद्रपूर
*©सदस्य :- मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🍃✍️🍃➿➿➿➿
*प्रेमकिरण*

प्रथम पाहिले जेव्हा तुला
मोहून गेले माझे सारे क्षण
विचारात मन गढून गेले
आशेचा मिळाला प्रेमकिरण….१

तुझ्या सहवासातले दिवस
झालेल्या आपल्या गाठीभेटी
स्मरणात आहेत अजूनही
आपण केलेल्या गूजगोष्टी….२

प्रेमाला प्रेमाने जिंकता येते
इतकेच मला ठाऊक
प्रेमात पडून असा नकळत
मी झालो फार भावूक…….३

आणाभाका घेतल्या प्रेमाच्या
जगू फक्त एकमेकांसाठी
आनंदी सहवासाचे प्रेमगीत
नित्य आसावे आपल्या ओठी……..४

जपेन मी हृदयात माझ्या
हा आशेचा प्रेमकिरण
विनंती करील देवाला
साथ आपली राहू दे आमरण……५

*श्री.पांडुरंग घोलप घोलप ता.कर्जत जि.रायगड*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃✍️🍃➿➿➿➿
*प्रेमकिरण*

प्रीया माझी धुंद
प्रेमकिरण सावली
गाली गुलकंद
लाली लाली ॥१॥

गोड शब्दांची गोळी
माझे प्रेमकिरण
तिच्यावर उधळी
दिसे ती नक्षत्र चांदण ॥२॥

लज्जेने होई चुर
जशी पूनव चंद्रीका
उगवे मुखावर
नभांगणीची जणूं मेनका ॥३॥

प्रीयासाठी आळवी
मी सप्तसूर धुन
आहे तीज प्रीय
ती प्राणाहुन ॥४॥

प्रेमकिरण प्रेमाची
ती माझी लेखणी
शाई आपुलकीची
उतरे कागदावर झणी ॥५॥

*© श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🍃✍️🍃➿➿➿➿
*प्रेमकिरण*

झाली अनाथांची आई
सिंधूताई सपकाळ माई
आशेचा प्रेमकिरण नवा
तिच्यामुळेच दिसून येई

माय बाप नाही ज्याला
ठेवूनी अनाथाश्रमाला
होऊनिया त्यांची आई
परतपाळही तिने केला

शिक्षण संगोपन करून
केले लहानाचे मोठे तया
प्रेमकिरणाने प्रेमसिंचन
आले त्यांचे भाग्य उदया

द्यावा आधार निराधारा
व्हावी आंधळ्या काठी
जीव लावाला जीवाला
जुळे ऋणानुबंध गाठी

व्हावा पाय लंगड्याचा
देऊन अपंगाला आधार
भक्कम ऊभे रहा पाटी
होईल त्यांचा ही उद्धार

प्रेमकिरण कवडसा जरी
येईल नशीबी गरजवंता
प्रकाश त्यांना आनंद देई
मिटेल भविष्याची चिंता

*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃✍️🍃➿➿➿➿
*प्रेमकिरण*

मानवसेवा हिच खरी
ईश्वरसेवा मानुनी
माणुसकीचे स्नेहवलय
निर्मिले बाबा आमटेंनी

समाजसेवेचे व्रत घेऊनी
झोकून दिले या कार्याला
स्वतःच्या विलासी जीवनाचा
समाजकार्यासाठी त्याग केला

कुष्ठमुक्त करूनी दिली
उभारी त्यांच्या मनाला
माणुसकीचे प्रेम देऊन
दिला आधार जीवनाला

दिव्यांग,अनाथांच्या आयुष्यात
दिला नव्या आशेचा प्रेमकिरण
स्वकर्तृत्वाने मार्गी लावले त्यांचे
उदासी निराशमयी जीवन

मानवतेचा अखंड झरा
वाहतो आमटे परिवारात
माणुसकीचे हे स्नेहवलय
पिढ्यानपिढ्या जपत आहेत

*सौ.प्रांजली जोशी, विरार,पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃✍️🍃➿➿➿➿
*प्रेमकिरण*

ना जाणो कुण्या जन्माचा
आला वाट्याला कर्मभोग
आज जडला अंगापांगाला
हा कसा दुर्धर दारूण रोग.. //

ज्या देहावर कधी कुणाचा
ओवाळला जात होता जीव
आज त्याचीच कुणालाही
थोडीही येत नव्हतीच कीव.. //

दुर्गंधी सुटलीय सर्वांगाला
झडू लागली एकेक बोटे
उघड्या डोळ्यांनी बघितले
गळू लागले नात्याचे मुखवटे.. //

अशाच एका मध्यानराती
देह कपड्यात गुंडाळला
चाचरत चाचपडत त्यांनी
एक निर्जन मार्ग धुंडाळला.. //

दिले फेकून गेले निघून
पडलोच होतो विव्हळत
व्यथा वेदनांनी अवघा
माझा देह होता निथळत.. //

आतल्या आतली करूणा
जणू त्याच्या कानी पडली
या कुष्ठरोग्याच्या जीवनी
अविश्वसनीय क्रांती घडली.. //

त्या जीवघेण्या नरकातून
आनंदवनाच्या स्वर्गात
बाबांच्या रूपाने संचारला
अद्भूत *प्रेमकिरण* शरीरात.. //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles