बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील विजेत्यांच्या चारोळ्या

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट नऊ🌈🌈🌈*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : प्रेमकिरण*🥀
*🍂बुधवार : २७ / सप्टेंबर /२०२३*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*प्रेमकिरण*

अंधारलेल्या,जीवनात
प्रेमकिरण,आले धावून,
प्रज्वलीत करण्या दिप
अर्पण, करून तन,मन.

*मायादेवी गायकवाड मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃✍️🍃➿➿➿➿
*प्रेमकिरण*

तुझ्या मुख चंद्रमाचे
माझ्यावर पडताच प्रेमकिरण
मन होतोय प्रकाशमय
फुलू लागतोय माझे जीवन

*केवलचंद शहारे*
सौंदड गोंदिया
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃✍️🍃➿➿➿➿
*प्रेमकिरण*

झरोक्यातून आलेले कवडसे
भासती प्रेमकिरण मज
साधीसुधी झोपडी माझी
भरभरूनी आणती तीत ओज

*बी. आर. पतंगे (बीके )*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃✍️🍃➿➿➿➿
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १०४ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे. कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*प्रेमकिरण*

तुझं प्रेमकिरण
जणू चंद्रप्रकाश
मनाचा भ्रम म्हणू
कि नुसती आस

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃✍️🍃➿➿➿➿
*प्रेमकिरण*

तुझ्या प्रेमकिरणाच्या
वर्षावात सदा मी नाहते…
तुझ्याच दिर्घायुष्यासाठी
गणरायाला फुले वाहते….

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
इंदापूर पुणे
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃✍️🍃➿➿➿➿
*प्रेमकिरण*

जीवनातील आशेचा प्रेमकिरण
आयुष्य जगण्या मिळेल स्फुरण
मिळो तुझे प्रेम जीवनभर
भासेल मज लाख मोलाची शिकवण

*श्रीमती कमल दवंडे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃✍️🍃➿➿➿➿
*प्रेमकिरण*

प्रेम किरण आशेचा
तिमिराला चिरत नेतो
सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर
आनंदाला कवेत घेतो

*सौ अर्चना जगदीश मेहेर*
ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃✍️🍃➿➿➿➿
*प्रेमकिरण*

दुखाःच्या ह्या वळणावर
दिलासा देई प्रेमकिरण
तू जरी दूर असला
तिन्हीसांजेला होते तव स्मरण

*सुनीता पाटील*
जिल्हा अहमदनगर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃✍️🍃➿➿➿➿
*चारोळी—प्रेम किरण*

निराशामय आयुष्यात..
येता आशेचा एक प्रेमकिरण
इंद्रधनु सप्तरंगी रंगात
आनंदे न्हावून निघते मन.

*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles