प्रेमातील त्याग व समर्पणाची दुसरी बाजू ‘प्रेमकिरण’; सविता पाटील ठाकरे

प्रेमातील त्याग व समर्पणाची दुसरी बाजू ‘प्रेमकिरण’; सविता पाटील ठाकरेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील परीक्षण_

“बागेतूनी वा बाजारातूनी, कुठून तरी त्याने
गुलाब पुष्प आणून द्यावीत, तिजला नियमाने,
कशास सांगू प्रेम तयाचे, तिजवरती होते
तुम्हीच उकला बिंग त्यातले, काय असावे ते.”

‘रायटर आणि फायटर’ असं ज्यांचा गौरव केला जातो ते प्र.के. अत्रे यांची ही प्रेमाची संकल्पना. निस्वार्थ भावनेने समोरच्याला सर्वस्व अर्पण करणे म्हणजे प्रेम. साऱ्या विश्वाला मुठीत व्यापणारी भावना म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे स्नेह आणि आपुलकी ,नाते आणि जपवणूक, काळजी आणि विश्वास, भक्ती आणि एकरूपता, त्याग आणि समर्पण अशा प्रेमासोबत किरण अर्थात ‘प्रेमकिरण’. एका बाजूने मर्यादा पण, दुसऱ्या बाजूला अमर्याद तो किरण.

विद्यानगरी पुणे सारखे शहरात सदाशिव पेठेत एका महाविद्यालयीन तरुणीच्या मागे एकतर्फी प्रेम करणारा एक माथेफिरू तरुण धावतो, तिच्यावर वार करण्याचा प्रयत्न करतो , पण दैव बलवत्तर म्हणून ती बचावते. नगरची दर्शना पवार एमपीएससी परीक्षेत मेरिटमध्ये येऊन अधिकारी बनते. सुखी संसाराची स्वप्न पाहते, पुन्हा एकदा तिच्या बाबतीतही तेच होतं. लग्नाला नकार दिलेल्या तरुणांकडून राजगडाच्या पायथ्याशी तिला कायमचं संपवलं जातं.

तुम्हीच सांगा आता याला खरं प्रेम म्हणू की वासना, विकृती कि स्वार्थ जबरदस्ती की असंतुलन??? खोट्या प्रेमातून क्रोध, दुःख आणि निराशा उत्पन्न होते. अपराधाचा ,अधर्माचा जन्म होतो आणि हेच प्रेम पतनाकडे , ऱ्हासाकडे माणसाला घेऊन जाते. प्रेमालाही दोन बाजू असतात, हा विचार सर्वांपर्यंत पोहचावा या हेतूने आज ‘बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी’ मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ‘प्रेमकिरण’ हा विषय दिला. परीक्षणार्थ रचना वाचताना माझ्या लक्षात आले. बहुतांशी रचना या प्रेमाची केवळ एकच बाजू विशद करणाऱ्या होत्या. पण याच प्रेमाला एक दुसरीही बाजू असते. ती मांडण्याचा मी प्रयत्न केला. आपण सर्वांनी सुंदर पद्धतीने विषयाला हात घातला. तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा…!

पण थोडं काही…! कुसुमाग्रज यांच्या मते काव्य हा माणसाच्या भोवतालच्या परिसराशी साधलेला संवाद होय. या भावनेने रचलेल्या कविता नेहमीच तरुणांना साद घालतात. तेव्हा बदललेल्या सामाजिक वातावरणात आपल्या काव्यरूपी सदविचारांचे बी पेरण्याचा प्रयत्न करूया. आपल्या ‘बी’ चा वटवृक्ष होईलच ही अपेक्षा ठेवून तूर्तास थांबते…!

सौ सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक,लेखिका,कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles