मी ‘भ××गिरी’ केली नाही, कॉन्ट्रक्टरला बुलडोजरखाली टाकीन; नितीन गडकरी

मी ‘भ××गिरी’ केली नाही, कॉन्ट्रक्टरला बुलडोजरखाली टाकीन; नितीन गडकरी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वाशिम: केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरी आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कार्यक्रमात धडाकेबाज भाषण केलं. यावेळी त्यांनी अनेक मोठी वक्तव्ये केली. नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची कान उघडणील केली. “मी प्रेशर आणून ठेकेदाराकडून काम करून घेतो. मात्र तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला त्रास देऊ नका. रस्त्याला तडा गेला, रस्ता खराब झाला तर मी कॉन्ट्रॅक्टरला बुलडोजर खाली टाकीन”, असं नितीन गडकरी म्हणाले. विशेष म्हणजे त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपवर अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया दिली.

“मी भxxगिरी केली नाही. मी आतापर्यंत 50 लाख कोटी रुपयांपर्यंतची कामे दिली आहेत. पण एकही कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट मिळविण्याकरता माझ्या घरी येण्याची गरज पडली नाही. मी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं आहे. रस्त्याला तडा गेला रस्ता खराब झाला तर कॉन्ट्रॅक्टरला बुलडोझर खाली टाकीन”, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

‘निवडणुकीत बॅनर लावणार नाही’

“राजकारणात खोटं बोलायच काम नाही. मी निवडणुकीत बॅनर लावणार नाही. कोणाला देशी-विदेशी दारू पाजणार नाही. मी पैसे खाऊ घालणार नाही आणि खाणार नाही. फक्त सेवा करायची”, असं नितीन गडकरी म्हणाले. तसेच “मी 45 वर्षांपासून मंत्री आहे. पण विमानतळावर मला घ्यायला कुत्रही येत नाही. मला सुरक्षा असल्यामुळे केवळ पोलीस असतात. कोणी हार घेऊन येत नाही, फुला हारात काही नाहीये, कामे झाली पाहिजेत”, असं नितीन गडकरी म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles