आदिवासीमधून आरक्षण दिल्यास पहिला राजीनामा माझा असेल’; अतुल बेनके

‘आदिवासीमधून आरक्षण दिल्यास पहिला राजीनामा माझा असेल’; अतुल बेनके



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जुन्नर : आदिवासी समाजाचे अधिकार व हक्क यांचे संरक्षण व्हावे यासाठी मी कटिबद्ध असून राज्य सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण दिल्यास आदिवासी समाजाचा आमदार म्हणून माझा पाहिला राजीनामा असेल.

असे आमदार अतुल बेनके यांनी सकल आदिवासी समाजाच्या वतीने जुन्नर येथे शुक्रवार ता.२९ रोजी आरक्षण बचाव आंदोलनाचे वेळी बोलताना जाहिर केले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरक्षण बचाव आंदोलनाची सुरुवात झाली. यावेळी असंख्य आदिवासी बांधवांनी जुन्नर शहरातून तहसिल कार्यालयापर्यंत रॅली काढली होती.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव गणपत घोडे यांनी जातीय तेढ निर्माण करण्यासाठी सरकार धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या विरोध चेतावण्याचे काम करत असून राज्यातील सामाजिक शांतता बिघडवण्याचे काम करत असल्याचे प्रास्तविकात सांगितले.

सरकारने सुधारून वागावे अन्यथा येत्या निवडणुकीत ५० आमदार पाडून आदिवासी समाजाची ताकद दाखवून देऊ असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी यावेळी बोलताना दिला तसेच बनकरफाटा येथे उद्या ता.३० रोजी नगर- कल्याण रस्ता रोको आंदोलनात करण्यात येणार समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आव्हान केले.

यावेळी मोहन लांडे यांनी स्फूर्ती गीत सादर केले. शुभम भवारी, शाम माळी, गोविंद साबळे, सुनीता बोऱ्हाडे , काळू गागरे , काळू शेळकंदे , पंडित मेमाणे यांची भाषणे झाली. नायब तहासिलदार सरिता रासकर यांनी मोर्चाचे निवेदन स्वीकारले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles