बाप्पाच्या निरोपाचा ‘भावूक’ क्षण; सुधा मेश्राम

बाप्पाच्या निरोपाचा ‘भावूक’ क्षण; सुधा मेश्रामपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात यावी यासाठी केली. तसेच, देशाप्रती असलेली भावना वाढविण्यासाठी त्यासाठी भारतीयांना एकत्र आणण्याकरिता आणि विचारांची देवाणघेवाण करण्याकरिता १८९४ साली पुण्यातील विंचूरकर वाड्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. तेव्हापासूनच गणेश चतुर्थी ह्या सणाला एक वेगळे महत्त्व आले आणि ह्या सणाला एक सर्वधर्मसमभाव म्हणून गणल्या गेले आहे. परंतु बाप्पाला निरोप देतांना प्रत्येखजण भावुक होतांना दिसतो.

*गणयाराच्या*
*निरोपाचा तो क्षण*
*भावूक मन*

गणेशोत्सव साजरा करता पर्यावरणाचा पण समतोल राखला पाहिजे आणि त्याची काळजी घेणे हे प्रत्येक माणसांचे आद्य कर्तव्य आहे. पाण्यात विरघळेल अश्याच वस्तू पासून शाडू माती, किंवा काळी माती घेऊन गणेशाची मूर्ती तयार करावी.मूर्ती विसर्जित करतांना थोडी काळजी घेतली पाहिजे घरीच एखादी पाण्याची टाकी करून विसर्जित करावी.नदीत,तलावात किंवा कालव्यात मूर्ती विसर्जन करतांना पाण्याचा अंदाज बघूनच तसेच लहान मुलांना पाण्यापासून दूर ठेवून जेणेकरून आपल्या किंवा दुसऱ्याच्या जीवावर बेतणार नाही यांची खबरदारी घेऊन मूर्ती विसर्जन करावे. कारण दरवर्षी अश्या अनेक घटना घडतांना पाहायला, ऐकायला मिळतात.म्हणून काळजी घेतली पाहिजे. तसेच निर्माल्याचे फुलं ते नदीपात्रात सोडून न देता, एखाद्या कुंडीत किंवा खोल खड्डा खोदून तेथे टाकावी जेणेकरून पाणी दूषित होणार नाही आणि आपण जलप्रदूषणावर आळा घालून नियम तो पाळून अनेक जीवांचा प्राण वाचवू शकतो…! मला हायकू परिक्षण लिहण्याची संधी दिल्याबद्दल मी राहुल भाऊ पाटील यांचे हदयस्थ आभार..!

सुधा अश्वस्थामा मेश्राम
अर्जुनी/मोर.गोंदिया
मुख्य परीक्षक, सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles