डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी पतसंस्थेची 15 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी पतसंस्थेची 15 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

परभणी: एखाद्या कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा एवढ्या खेळीमेळीच्या आणि उत्साही वातावरणात संपन्न होऊ शकते याचा सुखद प्रत्यय नुकताच आला. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी पतसंस्था मर्यादित जिल्हा परभणीची 15 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार (दि २९) रोजी हॉटेल फॉरच्युनमध्ये उत्साहात संपन्न झाली.

या सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस सतीश कांबळे उपस्थित होते. या सभेला जोडूनच विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घघाटन शिक्षणाधिकारी (प्रा) गणेश शिंदे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उप शिक्षणाधिकारी (मा.) गणराज यरमळ, गट शिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे, डॉ निलेश अंधोरीकर, इंजि भीमप्रकाश गायकवाड, प्रा डॉ सुरेश शेळके, शिक्षण विस्तार अधिकारी अण्णासाहेब जल्हारे, बलभीम माथेले, पतसंस्थेचे माजी संस्थापक अध्यक्ष बी. आर. आव्हाड आदींची उपस्थिती होती.

प्रास्ताविकामध्ये सतीश कांबळे यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेऊन भविष्यातील संकल्प जाहीर केले. नरवाडे, गायकवाड, शेळके, माथेले यांनी समयोचित विचार मांडले. या कार्यक्रमात विविध पुरस्कार प्राप्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि नवीन वर्षाच्या कालदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन राजू कांबळे यांनी केले.

या कार्यक्रमाचे भावलेले एक वैशिष्ट्य म्हणजे हार-तु-याला फाटा देऊन शाल, स्मृतिचिन्ह आणि पुस्तक भेट देऊन उपस्थितांचे स्वागत/सत्कार करण्यात आला. अर्थकारणाकडे आंबेडकरी समाजाचे दुर्लक्ष झालं असताना सतीश कांबळे आणि त्यांची टीम अत्यंत नेटाने आणि पारदर्शकता ठेवत बाबासाहेबांच्या नावाने असलेली ही पतसंस्था विकसित करत आहे याचा अभिमान वाटतो. विशेष म्हणजे ज्या खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा संपन्न झाली ते पाहून सतीश कांबळे आपल्या सभासदांमध्ये किती लोकप्रिय आहेत याची प्रचिती आली. हे सोपं नाही. पण ते ज्या पद्धतीने माणसं जोडत चालले आहेत ते अभिनंदनीय आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles