
जे. एस. एम. महाविद्यालयात व्यसनमुक्ती या विषयावर मनोविकार तज्ञ् डॉ. अनिल डोंगरे यांचे व्याख्यान संपन्न
‘व्यसनमुक्तीसाठी सकारात्मक मानसिकता व विचार आवश्यक’; डॉ. अनिल डोंगरे
तुषार थळे, प्रतिनिधी
अलिबाग: शहरात शनिवार दि. 30/09/2023 रोजी जे. एस. एम. महाविद्यालयात एन. एस. एस. प्रसिद्धी साप्ताहानिमित्त अलिबागचे सुप्रसिद्ध मनोविकार तज्ञ् डॉ. अनिल डोंगरे यांचे व्यसनमुक्ती या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. अनिल पाटील, प्रा. शाम जोगळेकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले, डॉ. पंकज घरत प्रा. विनायक साळुंखे आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांगितले कि, आज समाजात युवकवर्ग हा व्यसणाच्या विळख्यात अडकत आहे. विदयार्थ्यांचे व्यसनाबाबत प्रबोधन व्हावे या हेतूने या व्यख्यानाचे आयोजन केले आहे असे प्राचार्य डॉ. अनिल पाटील म्हणाले.
डॉ. अनिल डोंगरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले व्यसनाधिनता ही एक मानसिक विकृती आहे. व्यसन हे एक आकर्षण आहे मग ते दारूचे, तंबाखूचे किंवा चरस गांजाचे असो. त्यानंतर डॉ. डोंगरे यांनी व्यसनाची कारणे त्याचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम काय आहेत व त्यावरील उपाय याविषयी सविस्तर माहिती दिली.
आपल्या मनोगताच्या शेवटी डॉ. अनिल डोंगरे यांनी सांगितले कि, व्यसनमुक्तीसाठी सकारात्मक मानसिकता व विचार आवश्यक आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी आठवले यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. प्रविण गायकवाड यांनी केले.