
कास्ट्राईब संघटनेची राजव्यापी ‘गुगल मिट’द्वारे बैठक संपन्न
नागपूर: कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य संलग्न सर्व शाखेचे राज्य पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी सर्व जिल्ह्यातील कास्ट्राईबचे पदाधिकारी यांच्या विविध प्रश्नांबाबत आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन व 23 ऑक्टोबर 2023 महासंघाचे नागपूर येथे अधिवेशन बाबत आज दि (०१) रोजी आनलाईन मिटींग ‘गुगल मीट’ द्वारे संपन्न झाली.
आयोजित बैठकीत कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य संलग्न सर्व शाखेचे राज्य पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी, उपस्थित होते. विविध प्रश्नांबाबत आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन व 23 ऑक्टोबर 2023 महासंघाचे नागपूर येथे अधिवेशन नियोजनाबाबत सविस्तरपणे चर्चा झाली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. सर्वांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे उद्यापासून कामाला लागावे अशी विनंती, सतीश कांबळे, सरचिटणीस, कास्ट्राईब शिक्षक संघटना, सुमित भुईगड,वरिष्ठ उपाध्यक्ष, गणेश मडावी, कार्याध्यक्ष यांनी केली आहे.