
“आता वाघ नखांचेही पुरावे मागू लागलेत”? मुनगंटीवार निघाले ‘वाघ नखे’ आणायला लंडनला
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करताना जी वाघनखं वापरली ती वाघनखं महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. येत्या 16 नोव्हेंबरला ही वाघ नखं मुंबईत दाखल होतील. पण ही वाघनखं शिवरायांची नाहीतच असा दावा काही मंडळी करत आहेत. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार ती वाघ नखे आणायला लंडनला गेले आहे. आज ३ वर्षासाठीचा करार होणार असल्याची माहिती आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखे भारतात येणार आहेत, पण ही वाघनखे येण्याआधीच राजकीय वादळ उठले आहे. शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांची ही वाघ नखे खरी आहेत का? त्यांनी ती खरंच वापरली होती कां? असा सवाल करत आक्षेप घेतला आहे. त्याला उत्तर देताना भाजप आमदार आशिष शेलार यांनी कवितेच्या माध्यमातून ठाकरेंना फटकारले आहे.
*आशिष शेलार यांची मार्मिक कविता*
वाघ नखे येणार कळताच, इथले नकली वाघ का बिथरले?
छत्रपतींंच्या वंशजांकडे पुरावे मागणारे
आता वाघ नखांचेही पुरावे मागू लागले?
आम्हाला शिवकालीन जे जे सापडेल ते ते सारे प्रिय
छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती सुद्धा आम्हास वंदनीय
इथे हळूहळू हळूहळू औरंगजेबी वृत्ती मात्र डोकं वर काढतेय?
महाराजांच्या पराक्रमाचेच इथे पुरावे मागतेय?
आदू बाळाने शाळेतील पुस्तक सोडून अन्य काही वाचलेय का?
यांना वाघ नख टोचतात आणि पेंग्विन घेऊन हे गावभर नाचतात?
अहो, पब मधला थरथराट बाहेर असा कोण करतो का?
अफझलखान तुमचा कोण पाहुणा लागतो का?