
पश्चाताप
कोणताही निर्णय घेतांना
वेळ येऊ नये पश्चातापाची
विचारपूर्वक काम करून
घडी बसवावी जीवनाची.
योग्य वेळी योग्य असा
निर्णय तो घ्यावा
वेळ येणार नाही असा
विचार करत बसावा.
चूक होते नकळत
अगोदर दुरुस्त करावी
मन खंबीर करून
सत्यता ती स्वीकारावी.
चांगले तेवढे घ्यावे
वाईट ते सोडून द्यावे
सत्य तेच बोलत जावे
चांगले काम करत राहावे.
एक चुकीचे पाऊल
जीवन बदलून टाकते
ध्यानीमनी नसतांना
जीवनाची वाताहात होते.
- दिपककुमार सरदार
ता. लोणार जि. बुलढाणा