
प्रेमकिरण
प्रीया माझी धुंद
प्रेमकिरण सावली
गाली गुलकंद
लाली लाली ॥१॥
गोड शब्दांची गोळी
माझे प्रेमकिरण
तिच्यावर उधळी
दिसे ती नक्षत्र चांदण ॥२॥
लज्जेने होई चुर
जशी पूनव चंद्रीका
उगवे मुखावर
नभांगणीची जणूं मेनका ॥३॥
प्रीयासाठी आळवी
मी सप्तसूर धुन
आहे तीज प्रीय
ती प्राणाहुन ॥४॥
प्रेमकिरण प्रेमाची
ती माझी लेखणी
शाई आपुलकीची
उतरे कागदावर झणी ॥५॥
नीला पाटणकर,शिकागो.
=========