बाप्पाचा आशीर्वाद; पुष्पा डोनीवार

बाप्पाचा आशीर्वाद



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वर्षातून एकदा येतो
दहा दिवसाचा पाहुणा म्हणून
स्वागत करतो बाप्पा तुझे
हर्ष मनात आमच्या ठेवून

रोज सकाळी सायंकाळी
भक्ती भावाने पूजा आरती
जास्वंद फुले दुर्वाची जुडी
बाप्पा मोरया तुझ्या चरणावरती

भजन पूजन आरती पठण
रात्रंदिन मनी गणराया स्मरण
दुःख सारे जाई विसरुन
प्रसन्न चित्ताने केले गुणगान

मागत नाही तुज धन दौलत
सदा निःस्वार्थ भक्ती घडु देत
नित्य सेवा घडावी मज हातुन
सुख समृद्धी शांती लाभावीत

चुकले भुलले या पामराकडुन
माफ करुन घ्याल विघ्नहर्ता
पदरात एकच दान मागते मोरया
सदा शिरी असु द्या हात सुखकर्ता

बाप्पाचा आशीर्वाद घेताना
कंठ आलाय कसा दाटून
नाही सावरले स्वतःला
अश्रू वाहिले डोळ्यांतुन

पुष्पा डोनीवार
बाबुपेठ वार्ड चंद्रपूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles