भ्रमात;विष्णू संकपाळ

भ्रमात…पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तू येशील परतूनी मागे
भ्रमात या वावरत होतो
कोसळणाऱ्या मनाला
पदोपदी सावरत होतो..//

तुझ्या अनंत आठवांची
स्वप्नसेज सजवत होतो
मोरपीसी स्पर्श मिठीत
स्वत:ला निजवत होतो..//

तू फक्त माझीच आहेस
हाच धडा गिरवत होतो
मी तुला गृहित धरूनच
दाही दिशा मिरवत होतो..//

दिल्या घेतल्या वचनांना
रात्रंदिवस आठवत होतो
तुटू पाहणारी स्मृतीमाला
पुन्हा पुन्हा गाठवत होतो..//

कांहितरी चुकतच होते
जड मनाने पचवत होतो
आतून खूप जाचत होते
मात्र हसत लपवत होतो…//

तुझे असे हे नसून असणे
कळेना का भासवत होतो
तुझे परतणे असंभव तरी
स्वत:ला का फसवत होतो..//

विष्णू संकपाळ ,बजाजनगर छ. संभाजीनगर
=========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles