ये श्रावणा;मृदुला कांबळे

ये श्रावणापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

ये श्रावणा मनभावना
नभी सप्तरंगाची उधळण…
तुझ्या स्पर्शाने रोमांचित
अवघ्या सृष्टीचा कण कण…..

ऊन सावलीच्या खेळात
काळेकुट्ट ढग जमले नभात..
श्रावण सरी अंगावर झेलायला
मन मयूर नृत्य करी आनंदात…

श्रावण म्हणजे ऋतु हिरवा
आगंणात रिमझिम सडा शिंपला..
प्रफुल्लित झालेल्या वातावरणात
मरगळ झटकून उत्साह पसरला..

हिरवेकंच मखमाली आच्छादन
लावण्यवती दिसे वसुंधरा ….
हरिततृणांवर जलबिंदुने
अलंकारित दिसतो निसर्ग सारा..

तुझे आगमन सणाची चाहूल
फुलांची परडी सजली देव घरात..
बेलाचे पान, दुर्वा, जाईजुई, तगर
चंदनाची वाटी सोबत पारिजात….

ये श्रावण मासा तुझ्या
आगमनाची आतुरता भारी..
ये खळखळून कोसळून बरस
तुझ्या स्वागता सृष्टी झाली बावरी..

मृदुला कांबळे गोरेगाव-रायगड
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles