रिमझिम पाऊस;पांडुरंग एकनाथ घोलप

रिमझिम पाऊस



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भेट तुझी नि माझी झाली
तेव्हा सुरू होता रिमझिम पाऊस
घेतल्या आणाभाका दोघांनी
आठवण करून नको देऊस…१

तू विसरलीस सारे काही
मी जपल्यात आठवणी ऊरी
कळलेच नाही कशी झाली
तुझ्यामाझ्यात निर्माण दरी

चुकूनही पुन्हा नजरेसमोर
तू आता नको येऊस….
भेट तुझी नि माझी झाली
तेव्हा सुरू होता रिमझिम पाऊस ..२

तू तुझ्या नव्या वाटेवरती
आनंदात चालत राहो
सुखाच्या तुझ्या वेगळ्या कल्पना
सारे काही मिळत जावो

झाला असेल गैरसमज
फार मनावर नको घेऊस
भेट तुझी नि माझी झाली
तेव्हा सुरू होता रिमझिम पाऊस .३

घेशील समजून एकदातरी
माझ्या मनातील यातना
अपेक्षा होती कळतील तुला
माझ्या हृदयातील भावना

कधीही यानंतर आता
अंतरी डोकावून नको पाहूस…
भेट तुझी नि माझी झाली
तेव्हा सुरू होता रिमझिम पाऊस ..४

राहीन मी आता तुझ्याशिवाय
समजूत काढून मनाची
आठवण मात्र येत राहील
तुझ्यासोबतच्या प्रत्येक क्षणाची

झाले गेले विसरून जा तू
त्याच आठवणी नको पुन्हा जागवूस
भेट तुझी नि माझी झाली
तेव्हा सुरू होता रिमझिम पाऊस.. ५

पांडुरंग एकनाथ घोलप
ता.कर्जत जि.रायगड
===

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles