गांधीद्वेष’ एक शोकांतिका…!!; वनिता गभणे

‘गांधीद्वेष’ एक शोकांतिका…!!पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

‘बापू’ आज तुमची जंयती. डोळ्यावरचा ऐनक जरा नीट करा आणि तुम्हांला हार चढविणाऱ्या हाताकडे नव्हे; नजरेकडे बघा. द्वेषाची तर माळ नाही ना ती? कारण, ‘बापू’ मी रोज ऐकतोय इथे, की गांधींजी खूप वाईट होते..!!यूट्यूबवर तर तुमच्या विरोधी व्हिडिओची धूम माजली आहे. तुम्ही वाईट कसे हे सांगायला जणू रस्सीखेच रंगली आहे. तुम्ही अस्पृश्यता पाळली नाही. अस्पृश्यांना झिडकारलेही नाही. मग त्यांच्या मनात चीड का? हे अजून मला कळले नाही.. भारतीय स्वातंत्र्याचा अद्भुत, संस्मरणीय सोहळा, त्या सोहळ्यालाही तुम्ही हजर नव्हते. तुम्ही तर दंगे सोडविण्यात व्यस्त होते. आणि तरीही आम्ही म्हणतो गांधी खूप वाईट होते..!

खरी गंमत तर समोर आहे बापू, ‘नोबेल पुरस्कार’ विजेते नेल्सन मंडेला, मदर टेरेसा आणि भारताचे गौरवपुत्र जवाहरलाल दर्डा, भाऊराव पाटील, बाबा आमटे आणि यासारखे अनेक महापुरुष, आपल्या कार्याचे फलित तुम्हास अर्पण करतात. आणि सर्व यशाचे श्रेय तुमच्या विचारसरणीला देतात. या विचारसरणीवर चालणारे जर श्रेष्ठ तर; त्या विचाराचे बिज रोवणारे तुम्ही वाईट कसे?’ बापू’ हे न सुटणारे कोडे..! आणि शेवटचे सत्य ‘बापू’, ‘अल्बर्ट आइनस्टाइन ‘ नावाचा महान वैज्ञानिक आपल्या बाबतीत अगदी खरे बोलून गेला, ‘की येणारी तरुण पिढी या गोष्टीवर कदापिही विश्वास करणार नाही की, हाडामासाचा कोणी असा व्यक्ती या धरतीवर कधी होऊन गेला’…! या महान वैज्ञानिकाचे हे भाकित आज अगदी खरे ठरले आहे. बापू तुम्ही वाईट होते हे मानने मला अशक्य आहे…!!

वनिता गभणे (शिक्षिका, लेखिका)
आसगाव भंडारा
====

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles