किल्ले ‘अजिंक्यतारा’; स्वाती मराडे-आटोळे

किल्ले ‘अजिंक्यतारा’



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सातारचा किल्ला ‘अजिंक्यतारा’ म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. हा किल्ला शिलाहार वंशातील दुसरा भोजराजा याने इ.स. ११९० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे व नंतर आदिलशहाकडे गेला. १६७३ मध्ये शिवरायांनी हा किल्ला घेतला. १७०० मध्ये औरंगजेबाने किल्ला घेतला व आझमतारा हे नामकरण केले. नंतर महाराणी ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व अजिंक्यतारा हे किल्ल्याचे नाव ठेवले.

हा किल्ला सातारा शहरातच असल्याने अनेक मार्गाने या गडावर जाता येते. साता-यातून ज्या मार्गाने गडावर प्रवेश करतो, त्या मार्गावर दोन दरवाजे आहेत. त्यातील एक दरवाजा व दोन बुरुज आजही सुस्थितीत आहेत. गडावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. डावीकडे सरळ रस्त्याने गेल्यास महादेवाचे मंदिर आहे. समोर प्रसारभारतीचे कार्यालय व मागे दोन टाॅवर आहेत. पुढे डावीकडील वाटेवर मंगळादेवी मंदिराकडे असा फलक दिसतो. या वाटेत ताराराणीचा निवासाचा राजवाडा व कोठार अवशेष रूपात आहे. मंदिराकडे जाताना वाटेत तीन तळी लागतात.

मंगळादेवी मंदिरासमोर ‘मंगळाईचा बुरूज’ आहे. मंदिर परिसरात अनेक शिल्पे पाहायला मिळतात. तटबंदीच्या आत बाजूने पुढे जात राहिल्यास गडाला पूर्ण वेढा होतो. यावेळी गडाच्या उत्तरेला असणारे दोन दरवाजे दिसतात. या दरवाज्यात येणारी वाट सातारा कराड हमरस्त्यावरून येते. दरवाजाजवळ पाण्याचे तीन तलाव आहेत. मात्र उन्हाळ्यात याला पाणी नसते. किल्ल्यावरून समोरच यवतेश्वराचे पठार, कल्याणगड, जरंडा, सज्जनगड, चंदनवंदन किल्ले दिसतात. तसेच गडावरून सातारा शहराचेही सुंदर दृश्य दिसते. दक्षिण दिशेला पाडळी या गावात कोल्हापूरच्या रत्नागिरीवाडीच्या पुरातन मंदिर आहे. गावालगत असणा-या डोंगरात पांडवगळ नावाचे पुराणकालीन प्रेक्षणीय स्थळ आहे. निसर्गप्रेमींनी पावसाळ्याच्या सुरुवातीला येऊन या गडाची सुंदरता अनुभवावी. गड पहायला साधारण दीड तास लागतो.

स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
मुख्य सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.
=====

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles