सार्वजनिक गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप; सीमा प्र. वैद्य

सार्वजनिक गणेशोत्सवाचे बदलते स्वरूपपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आपल्या भारत देशाला पारतंत्र्यातून काढण्यासाठी, सर्व समाज, देश बांधवानी एकत्र येऊन समाज जागृत व्हावा, स्वातंत्र्याची चळवळ प्रखर होऊन, प्रत्येक भारतीयांच्या मनात ती रुजावी यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना लोकमान्य टिळकांच्या मनात निर्माण झाली. 1894 मध्ये पुण्यातील विचुरकर वाड्यात सार्वजनिक गणेशाची स्थापना करून अंमलबजावणी देखील करण्यात आली. एवढेच नव्हे, तर त्याच वर्षी 100 पेक्षा जास्त सार्वजनिक गणपतीची स्थापना पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झाली होती. भगवान गणेश हे आद्यदैवत, सुुखकर्ता, विघ्नहर्ता आहे. पण आज एकविसाव्या शतकात (2023)सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत असून, मूल्यहरण होत आहे.

भारत देशाला त्याच्या खास संस्कृतीमुळे जगात मानाचे स्थान आहे. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे झालीत. आजही गणेशोत्सव थाटात साजरा केला जातो. सणाचे महत्व, ते साजरे करणे, सर्व धर्मांचा आदर करून ,मूल्य जोपासून संस्कृती टिकवून ठेवणे हा एकमेव उद्देश असायला हवा. आज प्रत्येक वार्डात गणेशोत्सव बघायला मिळतो. “हा आमचा गणपती , तो तुमचा गणपती. आमची मूर्ती मोठी , तुमची लहान ” असे शब्द सहज कानावर पडतात. डेकोरेशन च्या बाबतीत चर्चा होते. अश्या निष्फळ gossiping मध्ये समाज एकत्र येण्याऐवजी विभागल्या जात आहे. जिथे माणसा माणसात देवावरून स्पर्धा सुरु होते, तिथे माणुसकी संपते. मोठ्या प्रमाणावर वर्गणी गोळा करून, डी जे लावून गणपतीचे आगमन होते. त्यानंतर 10 दिवस मोठ्या आवाजात सिनेमातील vulgar गाणी , शेवटी अंदाधुंद डी जे च्या आवाजात गणपतीची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. खरच देवाला हे अपेक्षित असेल काय….?

आवाजाचे प्रदूषण, गर्दीमध्ये होणारी चेंगरा चेंगरी, महत्वाच्या कामानिमित्त जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या मनाची काय हालत होत असते, हे ज्यांच त्यानाच माहिती. रस्त्यावर कितीतरी दवाखाने ,घरे असे असतात ज्यांच्याकडे दु:ख असते, आजारी लोक असतात अश्यावेळी समाजातील न दिसणाऱ्या घटकांच्या वेदना आम्हाला कळू नये. ही खंत नाही काय ? या 10 दिवसात बरीच हुशार मुले यात सहभाग न घेता upsc, mpsc, neet, jee ची तयारी करणारी असतात. अश्या मुलांना आतून रडतांना मी बघितलंय. आवाज कमी करा म्हटलं तर ‘ नास्तिक ‘ म्हणतात. यालाच गणेशोत्सव म्हणतात काय … ?

गणेशापुढे विचित्र गाणे लावून अश्लील हावभाव करून नाचणारे, दारू पिऊन धिंगाणे घालणारे, कपाटातले कपडे मिरवायला मिळावेत यासाठी पुढेपुढे करणारे, हे सर्व आस्तिक आहेत नाही काय…. ? मौज, मजा, मस्ती धिंगाणा म्हणजे, ‘उत्सव’ ही व्याख्या सद्या रूढ होत असताना दिसते. सध्याच्या काळात भावना खुंटत नाही; तर मरत चालल्या आहेत. डी जेच्या आवाजावर मर्यादा यायला हवी. देवाला मनोभवे निरोप द्यायला हवा. देवाची मिरवणूक काढणे योग्य आहे काय….? गणेशोत्सवं हा नक्कीच आनंदाचा सोहळा आहे.सकाही लोक याला गालबोट लावतात, त्यांना शिक्षा व्हायला हवी. वाढदिवस आहे लाव डी जे. लग्नात तर, हमखास असतोच. reception मध्ये तर ठरलंच आहे. प्रमोशन झालं किंवा काही आणखीन छोट्या मोठया कारणासाठी डी जे लावला जातो त्यातून गणेशोत्सव पण सुटला नाही. हे योग्य आहे काय……?

आनंद हा घ्यायचा असतो, की दाखवायचा हेच कळत नाही. समाज एकत्र रहावा, सन , उत्सव ,संस्कृती टिकून रहावी, आपला देश पुन्हा पारतंत्र्यात जाणार नाही. हे उद्दिष्ट समोर ठेऊन सार्वजनिक गणेशोत्सवं साजरा करता येणार नाही काय…..??? अश्या असंख्य प्रश्नांची उत्तरे कुठे मिळणार आहे काय ???

सीमा प्र. वैद्य
वरोरा, जि.चंद्रपूर
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles