जे एस एम कॉलेज येथे महाविद्यालयीन मुलींसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

जे एस एम कॉलेज येथे महाविद्यालयीन मुलींसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तुषार थळे, प्रतिनिधी

अलिबाग: जे.एस.एम. कॉलेज, अलिबागच्या महिला विकास कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कनिष्ठ महाविद्यालय आणि लायन्स क्लब,अलिबाग, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने जे.एस.एम. कॉलेज अलिबाग येथे महाविद्यालयीन मुलींसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन मंगळवार, दिनांक ३ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आले.

सदर शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतम पाटील, जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील, प्राचार्य डॉ. अनिल पाटील , उप्राचार्या डॉ सोनाली पाटील, डॉ. मेघा घाटे, स्त्रीरोगतज्ज्ञ, श्री. संजय पाटील, अध्यक्ष लायन्स क्लब आणि श्री प्रदीप नाईक,सचिव लायन्स क्लब यांची प्रमुख उपस्थिती होती.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.एस.एस. अधिकारी प्रा. सौ. अश्विनी आठवले यांनी केले आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ. अनिल पाटील आणि उपप्राचार्या डॉ. सौ. सोनाली पाटील यांनी केले. या कार्यक्रमास जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड.मा. श्री. गौतम पाटील आणि प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी विद्यार्थिनींना आरोग्याची तपासणी न घाबरता करून घेण्यास सांगितले. तर डॉ . साक्षी पाटील म्हणाल्या मुलींना या शिबिरामुळे आरोग्याविषयी काही तक्रारी असल्यास न लाजता सांगून डॉ घाटे यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा.

या कार्यक्रमास जनता शिक्षण मंडळाच्या जनसंपर्क अधिकारी सौ. सीमंतिनी ठाकूर,समितीचे सदस्य डॉ.जयश्री पाटील, सौ. शिल्पा कवळे, कु. श्र्वेता मोकल,सौ. अश्विनी दळवी, श्री. श्रावणी मगर, सौ. मयुरी पाटील, सौ . स्नेहा ठाकूर, सौ. संगीता गाढे, सौ.जागृती नाईक,इत्यादी यांचे सहकार्य लाभले. सदर शिबिराचा लाभ वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील १००विद्यार्थीनी आणि स्त्री प्राध्यापकांनी घेतला.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. स्नेहा ठाकूर यांनी आभार प्रदर्शन करताना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड.मा. श्री. गौतम पाटील, जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील,आणि प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी प्रोत्साहन दिल्याबद्दल आणि मार्गदर्शन केल्याबद्दल विशेष आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles