चांगले काम करून आदर्श पतसंस्थेने लोकांच्या मनात स्थान मिळवले  : मीनाक्षी पाटील

चांगले काम करून आदर्श पतसंस्थेने लोकांच्या मनात स्थान मिळवले  : मीनाक्षी पाटीलपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तुषार थळे, प्रतिनिधी

अलिबाग (प्रतिनिधी) ः आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने चांगले काम करून लोकांचा विश्वास संपादन ,  लोकांच्या मनात स्थाने मिळवले आहे. या पतसंस्थेची प्रगती थक्क करणारी आहे. भविष्यात आदर्श पतसंस्था मोठी झेप घेईल,  असे गौरवोद्गार माजी राज्य मंत्री मीनाक्षी पाटील यांनी काढले.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्यमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ वरसोली येथील होरीझॉन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील बोलत होत्या. आमदार महेंद्र दळवी, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक गरीश तुळपुळे, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड जिल्हा मध्यवर्ती  सहकारी  बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, व्दारकानाथ नाईक, आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील,  उपाध्यक्ष कैलास जगे व सर्व संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते.
आदर्श पतसंस्थेने हजारो मोती घडवण्याचे काम केले आहे. ही पतसंस्था कौतुकास पात्र आहे. चाकोरीच्या बाहेर जाऊन काम केल्यामुळे त्यांनी हे यश मिळवले आहे, असे मीनाक्षी पाटील म्हणाल्या.
सहकार टिकवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सहकारात काम करणार्‍या संस्थांना सहकार्य केले पाहिजे. सहकारी पतसंस्था टिकवण्यासाठी शासनाकडून मदत मिळवून देण्याचे काम मी करेन, असे आश्वासन आमदार महेंद्र दळवी यांनी दिले.

आदर्श पतसंस्थेने गरीबांना मदत केली. सामाजिक काम केले. त्यांच्याकडून इतरांनी देखील प्रेरणा घ्यावी, असे जे. एम. म्हात्रे म्हणाले. तंत्रज्ञानाला आर्थिक शिस्तीची साथ दिल्या मुळेच आदर्श एवढी प्रगती करून शकली, असे प्रदीप नाईक म्हणाले.

पारदर्शी कारभार, सचोटी आणि कणखर नेतृत्व यामुळेच आदर्श पतसंस्था आदर्श काम करू शकली, असे गिरीश तुळपुळे म्हणाले. आदर्श पतसंस्थेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. त्यामुळे या पतसंस्थेला कोणताही धोका नाही, असे आदर्शचे सल्लागार नितीन वाणी यांनी सांगितले.

आदर्श पतसंस्था चालवताना आम्ही नातीगोती पाहून काम केले नाही. आदर्शच्या कामात राजकारण आणले नाही. विविध क्षेत्रात काम करणारे संचालक मिळाले. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. कोणत्याही निर्णयाला विरोध केला नाही. कर्मचार्‍यांची चांगली साथ मिळाली म्हणून आम्ही हे यश मिळवू शकलो, असे आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. आदर्शचे माजी संचालक आनंद कोळगावकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. आदर्शचे  विद्यमान संचालक, माजी संचालक, हितचिंतक, आदर्श मध्ये सुरूवातीपासून काम करणारे कर्मचारी यांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अलिबागेतील जा.र .ह. कन्याशाळा , चिंतामणराव केळकर विद्यालय व कारागृहात डस्टबिन चे वितरण करण्यात आले. आदर्श  नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. आदर्शचे संचालक जगदीश पाटील यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

तसेच संस्थेच्या रौप्य महोत्सवी सांगता समारंभा निमित्त 01 ऑक्टोबर 23 रोजी रायगड  जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन होरीझोन सभागृहात करण्यात आले होते .

त्याला जिल्ह्यातील पतसंस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.  रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. जे. टी. पाटील यांच्या हस्ते प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.

सहकारी पतसंस्थांनी परस्परांमध्ये ठेवी व कर्जाच्या व्याजदरांमध्ये स्पर्धा करू नये.   आपल्या संचालकांप्रमाणे   सदस्यांना देखील प्रशिक्षीत करण्यासाठी पतसंस्थांनी पुढाकार घ्यावा , असा सल्ला रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. जे. टी. पाटील यांनी पतसंस्थांच्या पदाधिकार्‍यांना यावेळी  दिला.

अलिबाग तालुका सहाय्यक निबंधक श्रीकांत पाटील, रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थाचा महासंघांचे उपाध्यक्ष दिलीप जोशी, आदर्श नागरी सहाकरी पतसंस्थेचे संस्थापक सुरेेश पाटील, आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील , बँकींग तज्ज्ञ नितीन वाणी ,  आदर्शचे उपाध्यक्ष कैलास जगे, संचालक अनंत म्हात्रे, सतीश प्रधान , जगदीश पाटील , सुरेश गावंड, विलाप सरतांडेल , रामभाऊ गोरीवले, महेश चव्हाण , भगवान वेटकोळी, श्रीकांत ओसवाल , संजय राऊत , मकरंद आठवले , मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी पाटील यांच्यासह विविध पतसंस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी  यावेळी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles