डी.एड.च्या माजी विद्यार्थ्यांचा रौप्य महोत्सवी वर्ष स्नेहमेळावा संपन्न

डी.एड.च्या माजी विद्यार्थ्यांचा रौप्य महोत्सवी वर्ष स्नेहमेळावा संपन्नपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_म.गांधी अध्यापक विद्यालय,अरण्येश्वर, पुणे येथील माजी डी.एडचे विद्यार्थी उपस्थित_

_तब्बल २५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर साजरा करण्यात आला स्नेहमेळावा_

पुणे: म.गांधी अध्यापक विद्यालय येथील माजी विद्यार्थ्यांनी दि.०१|१०|२०२३ रोजी गेट टूगेदर चे आयोजन मोराची चिंचोली ता. शिरूर जि.पुणे येथे केले होते. सदर भेटीसाठी मोराची चिंचोली येथे आनंद कृषी पर्यटन मध्ये सर्व जमले होते. यावेळी सर्वच अगदी भारावुन गेले होते.

एवढ्या मोठ्या कालावधीनंतर
एकमेकांना भेटून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद अगदी ओसंडून वाहत होता. गेट टूगेदर समारंभास दूरवरून मित्रपरिवार जमा झाला होता. भेटीदरम्यान प्रत्येकाने आपल्या भावना आपल्या मनोगतात व्यक्त केल्या.

आनंद कृषी पर्यटन मधील मोर दर्शन ,
विविध साहसी खेळ,गप्पागोष्टी,गाणी
यांद्वारे आपल्यातील सुप्त गुणांना प्रत्येकाने वाट मोकळी करून दिली.
सर्वांनीच एकमेकांची आवर्जून विचारपूस केली. तसेच या प्रसंगी सर्वांनीच एकत्र हसतखेळत सहभोजनाचा आस्वाद घेतला.

२५ वर्षांनंतर झालेल्या या भेटीची आठवण कायमस्वरूपी रहावी यासाठी सर्वांना रौप्य महोत्सवी स्नेहमेळावा स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
तसेच आपल्याच मित्रांपैकी श्री.सुधाकर धाईंजे साहेब व श्री. दत्तात्रय बांगर साहेब यांची उच्च अधिकारी पदी निवड झाली असल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सदरील भेटीचे नियोजन शिरूरचे सर्व शिलेदार मित्रांनी केले होते.

सदर कार्यक्रम प्रसंगी माजी विद्यार्थी व गुरोळी तालुका पुरंदर येथील रहिवासी सीताफळाचे बागायतदार श्री हरिचंद्र भिकू खेडेकर यांनी आपल्या घरच्या बागेतील सीताफळे प्रत्येकास खाण्यासाठी भेट दिली. सर्वांनी सिताफळाचे व त्याच्या गोडीचे तोंड भरून कौतुक केले व त्याचा आस्वाद घेतला. पुढील वेळेस हरिश्चंद्र खेडेकर यांच्या सीताफळ बागेस भेट देण्याचे ठरविले.

मेळावा पार पडल्यानंतर सर्वांनीच जड अंतःकरणाने आपापाली परतीची वाट धरली. मात्र आपली ही मैत्री अशीच वृद्धिंगत होत राहो व चिरतरुण रहो अशा एकमेकांना सदिच्छा दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles