पुरस्कार’ एक स्वप्न;प्रतिभा गौपाले नागपूर

पुरस्कार’ एक स्वप्नपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

काल साहित्यासाठी नोबल पुरस्कार जाहीर करण्यात आला. साहित्यासाठी पुरस्कार म्हटलं, की असे वाटते ‘आपल्यालाही एखादं पुरस्कार जाहीर व्हावा..’! हो ना! पण त्यासाठी मेहनत, योग्य शब्द साठा, पुरेसी माहीतीही आवश्यक असते, सोबत कधी नशीबाची साथही हवी. असो, आपण सर्व साहित्यकांचे “पुरस्कार” हे स्वप्नच असतं. साहित्यसाठी नोबल पुरस्कार काल नार्वेचे लेखक जाॅन फाॅस यांना प्रदान करण्यात आला. एका साहित्यकाचे स्वप्न पूर्ण झाले. तसा मोठा साहित्यिकही असायला हवाच म्हना ..तर जाॅन लाॅस गाडीने घरी येत होते. तेवढ्यात त्यांना काॅल आला की , नोबल पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांना एवढा आनंद झाला की ते गाडीही चालवू शकत नव्हते. मग नोबेल ॲकाडमीचे सचीव मॅटस माल्म यांनी फाॅस कडुन वचन घेतले की तुम्ही सुखरुप घरी जा.. आणि नंतर काॅल करा.

खरंय पुरस्काराचा आनंद असाच असतो. त्यात एखादा साहित्यीक असेल तर साहित्यिक जरा जास्तच भावनिक असतो, म्हटलं तर प्रत्येक साहित्यिक हा भावनिक असतोच… तसेच हे जाॅन लाॅस होते. सुखरुप घरी पोहचुन नंतर माल्सशी बोलने करुन नीट समजुन घेतले तेव्हा त्यांचा विश्वास बसला. जगातील साहित्यकारातून एकाला नोबेल पुरस्कार मिळणे साधी गोष्ट नाही. पुरस्कार मिळाला म्हणजेच त्याचे योगदानही तेवढेच मोलाचे असणार. असणार काय आहेच की, फाॅस हे सर्वात गाजलेल्या नाटककारांपैकी एक आहेत.त्यांनी ४० नाटके लिहलीत. कादंबरी, लघूकथा, मुलांची पुस्तके, कविता आणि निबंध विपूल प्रमाणात लिहले आहेत. मोठे साहित्यिक असेच असतात . पण फाॅस यांनाच का मिळावं बरं नोबेल! त्याचही एक कारण आहे. जाॅन यांनी स्वतःची लेखन शैली, एक वेगळी ओळख निर्माण केली ती म्हणजे “फाॅस मिनिमालिजम”. सगळे त्यांना याच नावाने ओळखले जाऊ लागले. “स्टेंग्ड गिटार” या कादंबरीच्या दुसर्‍या आवृत्तीत त्यांनी हतबल, भिती आणि नैराश्य यावर लिखाण केले.

लोकांना अगदी सोप्या भाषेत पटवून दिले की नैराश्याकडे गेले की काय तोटे आहेत. यांच्या लिखाणात दैंनदिन जीवनात घडणार्‍या घटना आणि त्यामध्ये येणारे नैराश्य, साधारण लोक कसे हतबल होतात हे सांगितले आहे. सोप्या भाषेत त्याचे वर्णन आणि त्यावर मात करण्याचे उपाय या लिखाणामुळे “जाॅन फाॅस” यांना हा २०२३ चा साहित्यासाठी नोबेल पुरस्कार जाहीर झाला. ‘प्रीते काहीतरी शिक गं बाई’. तू पण लिखाण कर काहीतरी आणि नाव मिळव असेच काही तरी माझ्या मनाला जाणून आलं..!

प्रतिभा गौपाले नागपूर
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles