संयम आणि एकीचा प्रवास; उर्मिला गजाननराव राऊत

संयम आणि एकीचा प्रवासपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुणे नागपूर एक्सप्रेस प्रवास. पुणे प्रशिक्षणाची सूचना मिळाली. लगेच नागपूरवरून कोण कोण पुण्याला जाणारच्या उत्सुकतेने मैत्रिणींचा ग्रुप तयार झाला. प्रतिभाताईंच्या पुढाकाराने सर्वांची तात्काळ मध्ये तिकीटं झाली. सगळे कुटुंबाचा निरोप घेऊन उत्साहाने रेल्वेस्टेशनला संध्या. ५ वा. पोहोचलो.
संध्याकाळी साडेसहा वाजता ट्रेन सुटली. गप्पागोष्टी, खातपीत,उत्साहात, आनंदात प्रवास सुरू झाला .रात्री जेवण केलं .सकाळी नऊला पोहोचणारच आहोत मग या डब्यातील अन्नाचं काय करणार? म्हणून वाचलेलं अन्न कुत्र्यांना टाकून दिले. उशीरापपर्यंत गाणी,गोष्टी चालल्या. थोडे लोळावे म्हणून हात पाय पसरवले, स्वप्नात रंगलो. सकाळी मैत्रिणींना व घरच्यांना फोनवरून सांगितलं साडेनऊला पुण्यात पोचणार.
सकाळी नऊ वाजले उत्साहावर विरजण पडले. अचानक कळले पुणे एक्सप्रेसचा मार्ग मनमाड वरून बदलण्यात आलेला आहे आणि आमचे धाबे दणाणले. इथेच संयमाचा प्रवास सुरू झाला. काहींचे पहिले ट्रेनिंग होते त्या खूप चिंताग्रस्त झाल्या. सगळेजण वेगवेगळे मार्ग सुचवत होते. पण काहीच इलाज नव्हता. काहींनी सांगितलं तुम्ही औरंगाबादला उतरावे गाडी करावी आणि तिथून पुण्याला पोहोचाल. सगळ्यांची मतमतांतरे. अकरा मैत्रिणींची हिम्मत खचली होती.दोन मनांचे भांडण. एक म्हणतं औरंगाबादला उतरायला हवं आणि दुसरं म्हणतं आपली सुरक्षा महत्त्वाची. तोपर्यंत गाडी औरंगाबादच्या पुढे गेलेली होती.
अर्ध्या रस्त्यात उतरून कुठे जायचे त्यापेक्षा आपली भारतीय रेल्वे सर्वात सुरक्षित. आपण मध्ये कुठेही उतरायचं नाही. योग्य ठिकाणी ती पोहोचवणारच. हा विश्वास ठेवून सगळेजण बसून राहिलो. जवळचे खायचं सामान सुद्धा संपलेलं होतं पण जवळ काही बिस्कीट, चीप्सची पॅकेट्स होती. ते खाल्ले आणि पाणी पीत दिवस काढला. एकेक क्षण तासासारखा होता.
चक्क 31 तास प्रवास करून आम्ही रात्री दीडच्या सुमारास पुण्यात पोहोचलो. संघभावनेने, एकमेकांची साथ देत होतो. ऑटो करून आमच्या प्रशिक्षण स्थळी पोहोचलो. पहाटेचे दोन वाजले होते.
आम्ही पोहोचलो तेव्हा सगळीकडे कुलूपं,सुनसान,सर्व गाढ झोपेत होते. मात्र गेट जवळच्या खुर्चीवर नंबर दिसला. फोन करून वाॅचमनला उठवले. एक रूम कमी होती तरी रात्रभर आम्हाला अड्जस्ट करा उद्या सकाळी बघूया म्हणत आम्हाला रूम मिळाली. रूममध्ये गेलो. पोटात कावळे ओरडत होते पण जेवणाची काहीही व्यवस्था नव्हती .सर्व उपाशीपोटी झोपलो. सकाळी उठलो तयारी करून नाश्त्याच्या ठिकाणी पोचलो. आम्ही सर्वांनी अधाशासारखे प्लेटमध्ये घेतले आणि पोटभर खाल्ले. आम्हाला जो थकवा आलेला होता तो पूर्णपणे विसरून गेलो .
असा पुणे नागपूर एक्सप्रेसचा प्रवास आम्ही आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही कारण त्या प्रवासाने आम्हाला जे शिकवलं ते जीवनभर पुरवणारी पुंजी. कितीही संकटं आली तरी बाहेर पडता येईल. फक्त आपला आत्मविश्वास आणि संयम ढळू द्यायचा नाही. त्याबरोबरच आपुलकी, प्रेम, मैत्री, विश्वासाचा सुगंध दरवळला. झालेले कष्ट क्षणात विसरलो.
सुटकेचा श्वास सोडताना काही ओळी ओठी आल्या.

असे दांडगी इच्छा ज्याची,
मार्ग त्याला मिळती सत्तर ,
नजर रोखुनी नजरेमध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर//

सौ.उर्मिला गजाननराव राऊत
फ्रेंड्स कॉलनी, नागपूर
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles