अभ्यास माझा मराठी व्याकरण ; अशोक लांडगे

अभ्यास माझा
मराठी व्याकरणपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रश्न १ ला :- नाम , सर्वनाम , विशेषण , क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत ?

१) अविकारी

२) विकारी✅

३) एकवचनी

४) अनेकवचनी

प्रश्न २ रा :- वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंग वचन रुपात बदल होतो. त्या बदलास ……….. म्हणतात.

१) प्रत्यय

२) प्रकृती

३) परिवर्तन

४) विकार✅

प्रश्न ३ रा : – गाळलेला शब्द भरा. अव्ययालाच ….…. म्हणतात.

१) विकारी शब्द

२) पद

३) अविकारी शब्द✅

४) विकृती

प्रश्न ४ था :- शब्दांच्या जाती किती ?

१) चार

२) पाच

३) दोन

४) आठ✅

प्रश्न ५ वा : – ” अंधारी ” या शब्दाची जात कोणती ?

१) नाम

२) सर्वनाम

३) विशेषण✅

४) क्रियाविशेषण

प्रश्न ६ वा : – शब्द प्रकार ( शब्दजाती )ओळखा .- ” आपण ”

१) नाम

२) सामान्यनाम

३) सर्वनाम✅

४) भाववाचक नाम

प्रश्न ७ वा :- अविकारी शब्द म्हणजे काय ?

१) अव्ययांना अविकारी शब्द असे म्हणतात.✅

२) नाम , सर्वनाम , विशेषण व क्रियापद असलेले शब्द.

३) वाक्यात शब्दाचे रूप बदलते असे शब्द.

४) विकृती असलेले शब्द.

प्रश्न ८ वा :- ” हिरवीगार ” या शब्दाची जात कोणती ?

१) नाम

२) विशेषण✅

३) क्रिया विशेषण

४) शब्दयोगी अव्यय

प्रश्न ९ वा :- ” लवकर ” या शब्दाची जात ओळखा.

१) क्रिया विशेषण✅

२) उभयान्वयी अव्यय

३) क्रियापद

४) यापैकी काहीही नाही

प्रश्न १० वा :- ” आणि ” या शब्दाची जात ओळखा.

१) शब्दयोगी अव्यय

२) क्रियापद

३) उभयान्वयी अव्यय✅

४) नाम

संकलन/सहप्रशासक
श्री.अशोक गंगाधर लांडगे
ता.नेवासा जिल्हा अहमदनगर
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles