नात्यामुळेच जीवनाला खरा अर्थ; वर्षा मोटे

नात्यामुळेच जीवनाला खरा अर्थपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सर्वच प्राणीमात्रात समूहानं राहण्याची एकत्र जगण्याची मूलभूत प्रेरणा असते. मग मनुष्य प्राणी कसा त्याला अपवाद ठरेल ? म्हणूनच मनुष्य प्राणी हा सामाजिक प्राणी आहे असे म्हंटले जाते.तो समाजाशिवाय राहूच शकत नाही. आणी याच समाजशील वृत्तीमुळे सामाजिक आणि कौटुंबिक स्तरावर नातेसंबंध निर्माण होतात. हे नाते संबंध जपण्याची त्याच्या मनाची स्वभावीक ओढ असते. ही नाती अनेक रंगीं, अनेकपदरी असतात. आणि त्यामुळेच मनुष्याच भावाविश्व् समृद्ध होत जात नातेसंबंध ही संकल्पना तशी मानवनिर्मितच जन्माला आल्यापासुन मरेपर्यंत नाती ही आपल्यासमोर कोणत्या नां कोणत्या स्वरूपात भेटतंच असतात.

जीवनात अनेक महत्वाच्या उद्दिष्टापैकी नाती निर्माण करणं हे देखील उद्दीष्ट आहे. नात्यामुळे जीवनाला अर्थ मिळतो. नाती म्हणजे, खरे तर निखळ आनंदाचा झरा ! जीवनातील शुष्क उन्हाळ्यात प्रेमाची ओल जशी देतात तशीच गारवठणाऱ्या हिवाळ्यात उबही देतात त्या नातेसंबंधाचा मूलभूत आधार आहे ते म्हणजे विवाहसंस्था समर्पण भावाच्या तत्वावर उभ्या असलेल्या विवाहसंस्थेचे महत्व कधी ही कमी होणार नाही. या विवाहसंस्थेमुळे नातेसंबंधाचा विस्तार होतो पती -पत्नी, आई -मुलं, सासू -सून, आजी -आजोबा, नणंद -भावजय अशी कितीतरी जिवाभावाची नाती सुख -दुःख देणारी नाती निर्माण होतात. काही नाती जन्माबरोबर आपोआप मिळतात. त्याचबरोबर इतर काही नाती आपण निवडून -पारखून स्वीकारतो जसं मैत्रीचं नातं हीं सर्वच नाती जीवन सुंदर बनवतात. आपसात प्रेम जिव्हाळा आपुलकी, मोकळेपणा निर्माण करतात

आज जागतिकरणाच्या जीवघेण्या स्पर्धेत आभासी व सुख वस्तू जीवनाच्या ओढीमुळे परस्पर संवदाच्या आभावामुळे माणूस एकाकी होत चालेला आहे. नाती म्हणजे दोन ह्रदयातील अदृश्य पूल!आई -मुलांचं नातं निर्माण व्हायला अगोदर नाळ कापवी लागते. त्या अगोदर दोघेही एकच असतात. स्वतंत्र अस्तित्व दिल की, नातं निर्माण झालं म्हणजे एकरूपता असतानांहीं एकमेकांचं स्वतंत्र अस्तित्व मान्य केलं की नातं निर्माण होतं. म्हणेज दोन वेगळ्या व्यक्ती असल्या तरी त्या दोघाना साधणारा एक दुवा असतो. कधी तो प्रेमाचा असतो तर कधी सहकार्याचा, सहवेदनाचा या दुव्यालाच आपण नातं म्हणतो.

आज कोणतेही नातं दीर्घकाळं टिकवण तसं अवघड बनलं आहे आणि एखाद नातं तसं तुटलं तरी फारस वाईट वाटून घेतलं जातं नाही. आजकाल यां नंतर येणाऱ्या पिढ्या “नाते म्हणेज काय ?” हे विचारायला हीं कमी पडणार नाही अशी भीती वाटते. कारण पेराल तेच उगवेल ‘ हा निसर्गाचा नियम आहे. नाती टिकवण हीं एकतर्फी गोष्ट नाही. तर त्याला दोन्ही कडूनही प्रतिसाद हवा असतो. यासाठी विश्वास, आपुलकी, आत्मीयता हे नात्याचे बंध निर्माण करतात. त्यांचा एक धागा विश्वासाचा अनं दुसरा प्रेमाचा. एकूणच जीवनात नाते संबंध अतिशय आवश्यक आहेत. ते जपण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजे. आपण आपल्या मनाशी निगडित नातेसंबंधाची उजळणी करून बघूया ! काही नाती आणखीहीं शाबूत असतील तर त्यांना अधिक दृढ करणे याचा विचार करायला हवा यासाठी कसलाही मुहूर्त बघण्याची गरज नाही. येणारा क्षणचं शुभ मुहूर्त ! नाते संबंधाची दीपमाला अखंड प्रज्वलित ठेऊया ! नाती जपूया .!

वर्षा मोटे पंडित
छ.संभाजीनगर
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles