माझा पन्हाळगड; संचित कांबळे,

माझा पन्हाळगड



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

साधी सुदी नाही गड्या
माती ही लय पावन हाय
शिवबा राजांच्या स्पर्शाची
सर कशाच मातीला नाय

ती माती माझ्या पन्हाळगडची
तिची महानता किती सांगू
स्वराज्यभक्तीची नांदी इथली
दुश्मन इथे लागले रांगू

संभाजींची अन् आबासाहेबांची
भेट इथली भलतीच थोर
आजही कड्या कपारीला इथल्या
त्या भेटीचा निराळाच जोर

पन्नगालयाची महती सर्वदूर
सादोबांचा सुफी वारसा
प्राचीन अंबाबाई माता
दु:खी न कोणी इथे फारसा

सह्याद्रीच्या कोंदणातला
दूर्ग स्वराज्याचा बहू महान
पन्हाळ्याच्या दिमतीला
पावनगडही तो जरी लहान

तीन दरवाजाची भक्कमता
वाघ दरवाजाची साहसता
चार दरवाजाची आर्तता
राजदिंडीची सोशिकता

मोरोपंतांची भूमी सुंदर
साहित्याशी अतूट नाती
सान थोर सर्व इथे नांदती
धर्मएकतेचे गाणे गाती

कापूरबाव अन् राजवाड्याची
सर नसे त्यांची कुणाशी
सोमेश्वर वा सादोबा
नाते त्यांचे प्रत्येक मनाशी

ताराराणींचा हा प्यारा
दुस-या संभाजींचा आसरा
कैक पिढ्यांसाठी हसरा
हाच स्वर्गासम निवारा

संचित कांबळे, कोल्हापूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles