ऐरण; विष्णू संकपाळ

ऐरणपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मी ऐरण जणू तू घण, आता घाल कितीही घाव
उडतील ठिकर्‍या तुझ्याच,तू जोर कितीही लाव..//

ढळणार नाही तसूभर ही, टणक झालाय माथा
खणक घुमते असा ध्वनी,संघर्षाची अमर गाथा.. //

रंग, रूप,अन् गुण बदलुनी, जोम लावतो पुन्हा
स्तोम माजवी तू असा, जसा माझाच घोर गुन्हा ..//

मग्रूर बनूनी उगारतोय तू, असा विखारी फणा
अहंकाराचा पुरूषी दर्प, तुझ्यात भरलाय घणा.. //

एकटीच मी समर्थ असे, सदा ताठ माझा कणा
आधार लागतोय तुलाच, तू दांड्यावाचूनी उणा.. //

एकाच हाडा मासाचे, तू पुरूष आणि मी नारी
जेथे तेथे माझ्यावरती, तूच पडू पाहतोय भारी.. //

कमजोर नव्हे सोशीक, हाच माझा स्थायीभाव
पुरूषत्वाचा गर्व तुला,असे व्यर्थ फुकाचा आव.. //

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles