स्वअस्तित्वाचा गजर.. चल करूया जागर; स्वाती मराडे,पुणे

〰️〰️〰️〰️♾️🍁♾️〰️〰️〰️〰️
*✍️गुरूवारीय ‘चित्र चारोळी’ परीक्षण*
〰️〰️〰️〰️♾️🍁♾️〰️〰️〰️〰️
*✍️परीक्षणाच्या निमित्ताने…*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

〰️〰️〰️〰️♾️🙏♾️〰️〰️〰️〰️

*स्वअस्तित्वाचा गजर.. चल करूया जागर..*

बघ सखी.. नवरात्र सुरू झाला. माता आदिशक्तीची पूजा घरोघर बांधली जातेय. पहात आहेस ना तू.. ती अष्टभुजाधारिणी.. दुष्टांचे मर्दन करणारी.. दुर्जनांना ठेचणारी.. त्या देवीचाच अंश आहे तुझ्यातही.. तुही शिक दुष्ट वृत्तींना ठेचायला.. अन् देवीचा खराखुरा जागर करायला..!

तू शिकली आहेस इतिहासात स्वराज्याची ज्योत पुत्राच्या मनात पेटवणा-या आई जिजाऊसाहेबांना..
पतीची वा पुत्राची साथ नसतानाही समर्थपणे कारभार सांभाळणा-या अहिल्यादेवींना, स्वातंत्र्यासाठी लढणा-या शूरवीर राणी लक्ष्मीबाईंना.. एक स्त्री ठरवले तर काय करू शकते.. ती ज्योत ते स्फुल्लिंग आजही तेवते ठेवूया.. सखी हासुद्धा जागर करूया.

क्रांतीज्योती सावित्रीमाईने शिक्षणद्वार खुले केले. आपणा लेकींसाठी तिने किती नि काय सहन केले.. हेही माहीत आहे तुला व मला.. तो वसा तो वारसा प्राणपणाने जपूया.. ही तेवत ठेवूया ज्ञानज्योतीचे आगर.. चल करूया जागर..!

करूया जागर स्त्रीशक्तीचा
आता आत्मभान येऊ‌ दे
वाटो अभिमान कर्तृत्वाचा
यशाचा गोंधळ घालू दे…!

सखी.. स्त्री म्हणजे.. तेजाची शक्ती आदिशक्ती जणू तळपती वीज.. कुशीत जिच्या दडलंय भविष्याचं बीज.. वरदान तिला लाभलं ते म्हणजे मातृत्व.. हातात आहे तिच्या कर्तृत्व.. तिचं घरात असणं म्हणजे मांगल्य.. पान्हयामध्ये दडलंय तिच्या माया, ममता, वात्सल्य.. जन्मापासूनच लाभला तिला मनाचा संयम, दर्याच्या खोलीसारखं तिचं अथांग मन… तिच्याशिवाय नाही घराला घरपण.. ती म्हणजे त्याग, ती म्हणजे समर्पण, ती म्हणजे सेवा, ती म्हणजे सौंदर्य, ती म्हणजे सामर्थ्य.‌‌
पण तरीही अजून कित्येकींना नाही जाण स्व अस्तित्वाची.. म्हणूनच ही आधाराने वाढणारी वेल खंबीरपणे उभी राहिली पाहिजे.. यशाचं आभाळ कवेत घेत सोनसळी किरणांच्या अभिषेकात न्हाऊन ‌निघाली पाहिजे. म्हणूनच करूया जागर स्त्रीशक्तीचा.. तिला आत्मभान देण्याचा. आज चित्र चारोळी स्पर्धेसाठी आलेले चित्र हाच मतितार्थ सांगणारे. नवरात्री निमित्ताने आपण सर्वांनीही विविधांगी शब्दजागर मांडून लेखणीची वाटचाल विचार प्रवर्तनाकडे केलीत खरोखरच अभिमानास्पद. सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन 💐

आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संंधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार 🙏

➖➖➖➖☘️✍️☘️➖➖➖➖➖
*✍️सौ स्वाती मराडे आटोळे, पुणे*
*सहप्रशासक/कवयित्री/परीक्षक/ संकलक/लेखिका*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖☘️✍️☘️➖➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles