राज्यात थंडी वाढली; तर अंडी महागली

राज्यात थंडी वाढली; तर अंडी महागली



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

पुणे: राज्यात थंडीचा जोर वाढू लागला आहे. काही भागात तापामानात घसरण झाली असून गार वारे वाहू लागले आहेत. थंडीची चाहूल लागताच मात्र, अंड्याच्या दरात वाढ झाली आहे. अंड्यांच्या किंमतीत प्रतिनग दोन रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. थंडीचा कडाका वाढल्याने अंड्याच्या दरात तेजी आल्याचे पाहायला मिळाले आहे. अंडी ही उष्ण असतात त्यामुळं शरीराला उष्णता मिळावी यासाठी अंड्यांचे सेवन केले जाते. त्यामुळं थंडीच्या हंगामात सर्रास अंड्यांच्या किंमतीत वाढ होते. त्यामुळं सर्वसामान्यांचा प्रोटीनयुक्त आहार महागण्याची चिन्हे आहेत.

किरकोळ बाजारात अंड्याच्या दरात वाढ झाली आहे. पाच रुपये नग याप्रमाणे मिळणाऱ्या अंड्याचे दर आता सात रुपयांवर गेले आहेत. त्यामुळं प्रतिडझन 84 रुपयांनी अंड्याची विक्री होत आहे. काहि दिवसांत दर आणखी वाढून शंभरी गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी होलसेल बाजारात १६० रुपयांना ३० अंड्यांचा ट्रे मिळत होता. मात्र, 30 अंड्यांच्या ट्रेसाठी 180 रुपये मोजावे लागत आहे. मात्र, आता उत्पादन घटल्याने डझनाचा दर शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. अंडी नव्वद ते शंभर रुपये डझनने विकली जाण्याची शक्यता विक्रेत्यांनी बोलून दाखवली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles