मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सुसाट; पहिल्या टप्प्यातील पूल पूर्ण

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सुसाट; पहिल्या टप्प्यातील पूल पूर्णपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

नवी दिल्ली: भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद (Mumbai Ahmedabad bullet train) दरम्यान धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी 14 सप्टेंबर 2017 रोजी अहमदाबादमध्ये या प्रकल्पाचे उद्‌घाटन केले होते. या प्रकल्पाला मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉर (Mumbai-Ahmedabad High-Speed Rail Corridor) असे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 100 किलोमीटरचा पूल पूर्ण झाला (First phase bridge ready) असून 250 किलोमीटरचा पूल बांधण्यात येणार आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (ashwini vaishnav) यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाची झलक देणारा व्हिडिओ शेअर केला. तसेच प्रकल्पाशी संबंधित माहितीही शेअर केली. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनुसार, बुलेट ट्रेन (Bullet train project) प्रकल्पांतर्गत 40 मीटर लांबीचे फुल स्पॅन बॉक्‍स गर्डर्स आणि सेगमेंट गर्डर्स जोडून 100 किमी मार्गाची बांधणी करण्यात आली आहे. व्हायाडक्‍ट ही दोन खांबांना जोडणारी पुलासारखी रचना आहे.

या प्रकल्पांतर्गत गुजरातमधील पार (वलसाड जिल्हा), पूर्णा (नवसारी जिल्हा), मिंधोला (नवसारी जिल्हा), अंबिका (नवसारी जिल्हा), औरंगा (वलसाड जिल्हा) आणि वेंगानिया (नवसारी जिल्हा) या सहा नद्यांवर पूल बांधले जात आहेत.

गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात 350 मीटर लांबीचा पहिला डोंगर बोगदा तोडण्याचे काम पूर्ण झाले असून गुजरातच्या सुरत जिल्ह्यात 70 मीटर लांबीचा पहिला स्टील पूल बांधण्यात आला आहे. मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉरचा भाग असणाऱ्या स्टील पुलांपैकी हा पहिला पूल आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles