जीवन: ‘एक संघर्ष यात्रा’; स्नेहल संजय काळे

जीवन: ‘एक संघर्ष यात्रा’पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

‘मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएँ में उडाता चला गया, बरबादीयों का शोक मनाना फिजूल था, बरबादीयोंं का जश्न मनाता चला गया…’! दिल को छू लेने वाली, काळीज पिळवटून टाकणाऱ्या या गीताच्या ओळी, सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांनी ‘हम दोनो’ या चित्रपटात गायलेल्या. फारच श्रवणीय हृदयस्पर्शी आहेत. किंबहुना आयुष्य कोण कसं जगतं? याचं मार्मिक उदाहरण जणू. पूर्व संचित कर्माचा भाग जो आपल्या वर्तमान परिस्थितीवर प्रभाव टाकतो, त्यालाच प्रारब्ध म्हणायचं. कुणी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतो; तर कोणाच्या नशिबी खडतर संघर्ष असतो. ‘जीवन चलने का नाम’, म्हणून चालणं भाग असतं. कुणाच्या नशिबी संघर्ष हा मुळी नसतो, राजयोगच म्हणावा लागेल. तर कोणाचं आयुष्य मात्र पूर्णपणे फक्त संघर्ष आणि संघर्षाने भरलेलं असतं. म्हणतात ना, ‘परमेश्वर त्याला संघर्ष देतो, ज्याला तो पेलवण्याची क्षमता देतो’. एक समस्या सुटली की, दुसरी जणू तयार. समस्यांची, संकटांची जणू मालिका तयार होते आणि न सुटणारा तिढा तयार होतो. आणि अचानक एके दिवशी हंबरडा फोडावासा वाटतो.

हंबरडा फोडला तरी, ऐकणार कुणी तरी असावं, डोळ्यातली आसवं पुसून, ‘मी आहे तुझ्या पाठीशी’, अशी खंबीर साथ देणारं तरी कुणी असावं. पण ह्या असतात फक्त कल्पना. प्रत्यक्षात तसं काही घडत नाही. “जीवन एक संघर्ष यात्रा” असते. आपल्याला ही संघर्ष यात्रा आपापल्या कल्पकतेने, परिश्रमाने, प्रयत्नाने पार पाडायची असते. कुबड्यांचा आधार घेतला की, मदत होते क्षणभराची. मात्र उपकार राहतात आयुष्यभर. म्हणून कुबड्यांचा आधार न घेता यशस्वी व्हायच असतं. ज्याच्याजवळ दांडगा आत्मविश्वास आहे, त्याला कधीच कोणी हरवू शकत नाही. ज्याच्याकडे शून्यातून सुरुवात करण्याची जिद्द आहे, तो कधीपण स्वतःच विश्व निर्माण करू शकतो. फक्त जिद्द आणि सकारात्मकता हवी. त्याच्या जोरावर हवं ते वास्तवात मनुष्य उतरवू शकतो आणि ‘जीवन एक संघर्ष यात्रा’ सफल करू शकतो.

स्नेहल संजय काळे
फलटण, सातारा.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles