नवरात्रीतील औषधी वनस्पती संबंध;मायादेवी गायकवाड

नवरात्रीतील औषधी वनस्पती संबंधपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मार्कंडेय वैद्यकीय उपचार पद्धतीत, नऊ आयुर्वेदिक वनस्पतींना आपल्या दैनिक जीवनात अनमोल स्थान असून, त्यामुळे जीवनमान आरोग्यदाई होते. नवरात्री आणि त्यांचा सहसंबंध समजून घेऊया.

1) शैल पुत्री (हिरडा): कुंभ राशींच्या पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचा पर्यायी वृक्ष हिरडा आहे. “नास्ती यश गृहे माता तस्य माता हरितकी” असें हिरड्याचे महत्व आहे.नोव्हेंबर ते जानेवारी मध्ये पिवळे आणि तपकीरीरंगाचे असते. महाबळेश्वर, कोयना तसेंच मध्य प्रदेशातील नदी किनारी चांगल्या निचरा होणाऱ्या जमिनीतआणि भरपूर सूर्यप्रकाशअसणाऱ्या ठिकाणी ते येते. त्याचे 3प्रकार आहेत 1) बाळ हिरडा 2) चांभारी हिरडा यात tanin असते ते कातडी रंगवण्या कामी येते. 3)सुरवाडी हिरडा: दात दुखणे, उचकी खोकला, गर्भाशयासाठी बलशाली, मासिक पाळी समस्या, पचनासाठी गुणकारी, हिरडा फुलांपासून उत्तम मध मिळते. याला पर्यावरण रक्षक म्हणतात. गर्भवतीने हिरडा खाऊ नये अपाय होतो.

2) ब्रम्हाचारिणी (ब्राम्ही वनस्पती): यामुळे स्मरणशक्ती वाढते, केसाची वाढ होते, शांत झोप लागते, आयुर्मान वाढते, स्वर चांगला होतो, रक्त दोषनाशक आहे.

3)चंद्रघंटेन्ती (चंद्रसूर, हालीम, चमसूर ): आपल्या शरीसास पोषण देणारी दिव्य वनस्पती आहे.व्हिट्यामिन सी, इ ए, प्रोटीन, लोह, फायबर देते, पालेभाजी म्हणून वापर होतो, साधेदुखी, हृदविकार, मासिक पाळी, विकार दूर करते, बाळंतीनीचे दुध वाढविते, रोग प्रतिकार शक्ती वाढविते,लठ्ठपणा कमी करते, बळदाई आहे.आजारी व्यक्तीच्या तोंडास चव देणारी लाभदाई वनस्पती आहे.

4) कुष्माण्डेती चतूर्थ कम (कोहळा): पेठा, मिठाई यामुळे बनते, आतड्यास बळ देते.कफ पित्त वात नाशक आहे. हे फळ भोपळा आकाराचे आहे.

5) पंचमं स्कंदमातेती अळणी (स्कंदमाता)जवस : महिलांच्या सर्व आजारावर लाभकारक आहे., ओमेगा 3,6/प्रोटीन, व्हिटामिन सी, इ, के, बी -कोम्पलेक्स, कॉपर, झिंक, म्यगनीज, फॉस्फरस,आयर्न मिळते. गर्भाशय गाठी कमी होतात, हार्मोन्स कमी होतात. नियमित वापराने फायदा होतो, मुखशुद्धी साठी फायदा होतो, चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात, लेपसाठी वापर लाभदायी,चेहऱ्यावरील केस कमी होतात.

6)कांत्यायनी (अंबाडी ): रक्तदाब नियंत्रीत करते, कफ गळ्याचे आजार दूर करते, शरीरातील चरबी दूर करते,डोळ्यासाठी लाभ दाई, भरपूर कॅल्शियम, हाडे मजबूत करते, डायट म्हणून वापर, लघवी जळजळ कमी होते, लागलेली उन्हाळी कमी होते. ऍसिडिटी वाल्यानी हीं वनस्पती खाऊ नये. कफ गळा आजारास लाभदायी आहे.

7)कालरात्रीति (नाग दवणीवनस्पती): सर्व ठिकाणी असते थंड असून, बवासिर, मूळव्याध, रक्तश्राव, साठी लाभदाई, सूज, अल्सर, आतड्याच्या विकरावर लाभ दाई,तिच्या लागवडीमुळे सकारात्मक ऊर्जा मिळते, याच्या पानांचा चीक विष नाशक आहे. याच्या पानांचा चीक काळ्या मिरी सोबत खाल्याने, जखमेतील वाहणारे रक्त थांबते.

8) महागौरीतिचाष्टम (तुळस): धार्मिक, पर्यावरण आयुर्वेदिक महत्व आहे. सकारात्मक ऊर्जा मिळते, ऑक्सिजन देते, रोग प्रतिकारशक्ती वाढवते, सर्दी पडसे झाले तर काढा पिणे लाभ दाई, त्वचारोलाभ दाई,रक्तशुद्ध करते, स्मरण शक्ती वाढवते, मज्जा संस्था बलशाली करते,स्वाद छानआहे याचे सेवन करावे. हृदय मजबूत करते.मूत्र वर्धक आहे व्हिट्यामिन सीझिंक,मिळते ऍक्टिबॅक्टिरिया आहे.

9)सिद्धीदात्री(शतावरी): शेकडो फायदे देणारी वनस्पती हे तिचे नाव आहे. बालवृद्धा पर्यंत उपयोगी आहे. स्मरणशक्ती, हार्मोन्स, बल, वीर्य वाढवते. वात, पीतनाशक, चिडचिड कमी होते. हृदय, श्वास मजबूत करते, दमासाठी उपयोगी आहे, भूख वाढवते, कृमी नाशक, अतिसार बवासीर साठी लाभ देते. म्हूणन, कोणत्या वनस्पती मध्ये कोणत्या देवीचा निवास आहे हे जाणून घेतले ना. चला तर मग तिच्या पूजनाने आणि वनस्पती च्या सेवनाने आपल्या शरीरास पोषण, आरोग्य देऊयात. आणि उत्तम आरोग्याचे धनी होऊया

मायादेवी गायकवाड
ता.मानवत, जि.परभणी

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles