मूल्यशिक्षण: मूल्य..संवेदनशिलता;वसुधा वैभव नाईक

मूल्यशिक्षण: मूल्य..संवेदनशिलतापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे .मी इ.चौथीचे स्काॅलरशीपचे वर्ग शाळेतच घेत असे, पण घर शाळेजवळ असल्याने मी मुलांना डिसेंबर ते फेब्रुवारी परीक्षा होईपर्यंत घरी बोलवायची. संध्याकाळी ५ ते ८ रोज एक पेपर सोडवून घेवून त्याची चर्चा करून तपासणे असे काम मी करत असे. मी अरण्येश्वर विद्या मंदीर मध्ये आहे.पण नू. म.वि.चा एक विद्यार्थी माझ्याकडे स्कॉलरशिप येत असे. त्याचे पालक त्याच्या वर्तणुकीला खूप वैतागले होते. त्यांना कोणीतरी माझा पत्ता दिला. ते मला भेटले. त्या मुलाचे नाव सोहम . सोहमचे पालक मला भेटायला आले खरे; पण ते फार वैतागलेले दिसत होते. थोडक्यात सोहमचे वागणे, बोलणे, मला सांगितले तो ही स्काॅलरशीपला बसलेला आहे, हुशार आहे सर्व सांगितले, त्याला माणूस बनवा असेही बोलले . त्याला शिकवण्याची विनंती त्यांनी मला केली.मी आव्हान स्विकारले .तो फक्त आठवड्यातून तीनच दिवस यायचा.पण माझी मुलं व त्याची वेळ मी एकत्र केली नाही. त्याला पूर्ण दोन तास स्वतंत्र वेळ दिला.

एका रविवारी सोहम छान आवरून घरी आला, आम्ही दोघेही छान सतरंजी अंथरूण त्यावर बसलो. त्याच्या शाळेची, मित्रांची चौकशी केली त्याला जरा बोलते केले. आधीच तो फारच धीट होता. त्याच्या मनाची चलबिचल थांबवली आणि मी माझ्या बुद्धिमत्ता या विषयाकडे वळाले. सोहमला विचारले “बाळा, एक मांजराचे पिलू आहे. त्याला लागलेय त्याला नीट चालता येत नाही आणि पिलाला रस्ता ओलांडायचा आहे तू काय करशील?” सोहम म्हणाला “मी त्याला दगड मारेल आणि त्याची मजा बघत बसेल”
मी शांत बसून त्याला दुसरा प्रश्न विचारला” सोहम, एक आंधळे बाबा आहेत, त्यांना रस्ता ओलांडायचा तर ,तू काय करशील? ” सोहम म्हणाला” बाई, मी त्यांची मजा बघेन”

आता मात्र मी जरा आश्चर्यचकीत झाले. मनात म्हटले, म्हणूनच आईबाबा वैतागलेले दिसतात याच्यावर. याला दुसऱ्या बद्दल काहीच वाटत नाही. मी त्याला जवळ घेतले. त्याला छोटीशी बोधकथा सांगितली. कथेत त्यालाच निवडले. जर सोहमला लागलय त्याला चालता येईना तर, त्याच्या मित्रांनी त्याचा हात धरून त्याच्या घरी त्याला व्यवस्थित सोडले. तसेच आंधळ्या आजोबांना त्याच्याच मित्रांनी रस्ता ओलांडायला मदत केली. आता सांग तुला काय वाटते. सोहम म्हणाला”बाई मला लागल्यावर मित्रांनी मदत करायलाच हवी .पण आंधळ्या आजोबांनाही त्यांनी मदत केली कशाला करायची मदत त्यांना”? मग मी समजून सांगितले “बाळा, मनात एकमेकांबद्दल आदर हवा. संवेदना हवी, एकमेकांचे सुख – दुःख समजून घेण्यासाठी तसे कोमल मनही हवे माणसाजवळ, तसे तुझे आहे का? विचार कर या गोष्टीवर. मोठी माणसे, मुके प्राणी, वृद्ध लोक यांना काही हवे असेल तर आपण ते द्यावे, मदत करावी. साधी मदत तू करू शकतोस. आजी आजोबांना पाणी देणे. त्यांनी सांगितलेली छोटी कामे ऐकणे. उलट उत्तर न देणे. प्राण्यांना दगड न मारणे. त्यांना लागले असेल तर आईला सांगून त्यांची काळजी घेणे. आईच्या कामात मदत करणे.”त्याला समज दिली.एवढे चालू असतानाच त्याची आई आली आणि सोहमचा तास संपला.

दुसर्‍या दिवशी सोहम आला तो खूप आनंदी अन प्रसन्न दिसत होता. त्याच्या आईने मला बाहेर बोलावले व सांगितले”बाई, एका दिवसात का जादूची कांडी फिरवलीत सोहमवर ,तो त्याच्या आजी,आजोबांबरोबर खूप छान बोलत होता .आम्हांला खूप छान वाटले. मला कामात मदत केली. बाबांना उलट उत्तरे दिली नाहीत.” मी खूश झाले.घरात जावून कालचेच प्रश्न मी परत सोहमला विचारले असता त्याने खालील उत्तरे दिली.१) मी मांजराला हातात घेईन व रस्त्यापलीकडे ठेवीन. २) आंधळ्या आजोबांच्या हाताला धरून त्यांना रस्ता ओलांडायला मदत करीन. सोहमकडून ही उत्तरे ऐकून मी धन्य धन्य झाले आणि सोहममधे संवेदनशिलता जागृत करण्यास यशस्वी ठरले.एक माणूस घडवला. आज हा मुलगा PSI आहे. मला फोन करतो. मला म्हणतो “बाई काही मदत लागली तर अवश्य सांगा”.मला अभिमान आहे सोहमचा…! त्याचे आई, बाबा अजूनही मला भेटायला येतात. छान वाटते. देवा अशीच मुले माझ्याकडून घडावीत ही सदिच्छा आहे.

वसुधा वैभव नाईक
प्रायमरी शिक्षिका,अरण्येश्वर शिक्षण संस्था
सहकारनगर पुणे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles