आत्मनिर्भर स्त्री; अशोक महादेव मोहिते

आत्मनिर्भर स्त्री



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जग चाललंय हे चंद्रावर
स्त्री अन पुरुष बरोबर !

विचार बदलले खरोखर
स्त्रियां पाठीशी खंबीर !

दिलंय स्वातंत्र्य दर्जेदार
वाटतो नवऱ्याचा आदर!

दिलाय वेळोवेळी आधार
उभा सक्षम मी पायावर!

सुखाचा आमचा संसार
दोघात नित्य एक विचार!

आत्मनिर्भर स्त्री बरोबर
होतो सन्मान वारंवार !

जगा आयुष्य हे मजेदार
मनुष्य जन्म नाही येणार!

आजची स्त्री आत्मनिर्भर
उघडते प्रगतीचे नवे द्वार!

मुलांचे संगोपन हे वेळेवर
राबराबते किती दिवसभर!

नसतो आराम थोडाफार
तरी जपते नाती रे सुंदर !

सद्गुणांचा करी विचार
प्रतिष्ठा जपते ही निरंतर!

मानाचा मुजरा हा त्रिवार
स्त्रियांचा मनातुन आदर!

स्त्रिया बनल्या आत्मनिर्भर
अभिमान वाटतो खरोखर!

आई,बहीण,पत्नी जरूर
शोभते स्त्रीच समजदार!

समजू नकोस रे कमजोर
स्वर्ग नरक तिच्या पायावर!

अशोक महादेव मोहिते
बार्शी जिल्हा सोलापूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles