संविधान माझे;डॉ.पदमा जाधव-वाखुरे,

संविधान माझे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

न्याय स्वातंत्र्य समता बंधुता मूल्य
चतु:सूत्री बहाल केली अमूल्य
मोल त्याचे घ्या साऱ्यांनी समजून
अस्मिता राष्ट्राची जाईल उजळून

संविधान माझे नाही मक्तेदारी कुणाची
त्याने बहाल केली गुरुकिल्ली न्यायाची
कायद्यापुढं आपण सारेच समान
नाही खपवून घेणार कोणताही अवमान

संविधानाने बहाल केले आम्हाला
स्व नी देशविकासास्तव स्वातंत्र्य
का यावे इथे कुणाच्या वाट्याला
फुकाचे परदास्य नी पारतंत्र्य

सर्वार्थाने घेईल मी इथं मुक्त श्वास
राष्ट्रधर्म ग्रंथावर माझा आहे पूर्ण विश्वास
विविधतेत एकता खासियत देशाची
आपण सारे एक होऊन शान वाढवू त्याची

सुजलाम सुफलाम राष्ट्र घडवूया
आणि भारतमातेचे सुपुत्र शोभुया
भारतमाताही मग जाईल सुखावून
शुभाशीष देईल अंतःकरणापासून

डॉ.पदमा जाधव-वाखुरे,छ.संभाजीनगर
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles