संस्कारातून शिक्षणाकडे;हंसराज खोब्रागडे

संस्कारातून शिक्षणाकडे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अल्लड बालमन म्हणजे
कच्च्या मातीचा घडा
संस्कारमय प्रेमाधाराने
शिक्षणाचा द्यावा धडा

कान, मुख, डोळे त्याचे
असतात सदा खुळे
कुटुंब, समाजाचा वसा
त्याच्या रोमारोमांत डुले

वय असलं कमी तरी
अनुकरणाची गती फार
वाडवडिलांचे वर्तन हेच
बालकास अमृताची धार

असावी मोकळीक तया
स्वच्छंद सैर करण्याची
द्यावे दाखले तेव्हाच
पाखरांचे दाणे टिपण्याची

योग्य संस्कारमोती
देती धडे मानवतेचे
चढता साज त्यात शिक्षणाचा
गाठती शिखर यशाचे

बिंबविलं जे बालमनी ठासून
आचरणी ते वसे ठायी ठायी
संस्कारातून शिक्षणाकडे
प्रकाशवाटेस दिशा दाही

हंसराज खोब्रागडे
अर्जुनी/मोर, जि . गोंदिया
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles