जाण जगण्याची गोडी;मनिषा सुतार

जाण जगण्याची गोडी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अरे अरे धावणाऱ्या माणसा
किती करशील तू पैसा पैसा
आभासाला तू भुलला कसा
मृगजळ पाठी पळतो जसा

बघ वास्तवाच भान ठेवून
राहु जमीनीवर पाय रोवून
जगण्याची गोडी घे जाणून
मिळेल त्यात सुख घे मानून

वागण असु देत माणुसकीचं
पुण्य मिळवावं ते दानधर्माचं
पदरी दान कमव समाधानाचं
सोड जगणं स्वार्थी हव्यासाचं

आली अज्ञानी अंधाराची रात
ज्ञानज्योतीने होई त्यावर मात
स्वार्थी बुद्धीने करू नको घात
प्रामाणीकपणा ठेव तू अंतरात

सुडबुद्धी , द्वेषभावने वागू नको
कुठल्याही कष्टाला तू लाजू नको
भ्रष्ट्राचाराला बळी तू जाऊ नको
सच्चेपणा कधीच तू सोडू नको

इमानाचं जगणं देईल वरदान
आयुष्य जगावं आनंदाने छान
निस्वार्थी सेवाभाव देई सन्मान
देशभक्तीभाव आयुष्याची शान

मनिषा सुतार
पिंपरी चिंचवड, पुणे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles