दुनिया पैशाची; सुलोचना लडवे, अमरावती

दुनिया पैशाची



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नातीगोती आपुलकीची
पैशापुढती पडती फिके
दुनिया ही आहे पैशाची
खेळ सर्व स्वार्थी मनाचे

जन्मदाते मायबाप पूज्य
परी चिंता ना करी तयांची
संपत्तीवर नजर मुलांची
वृद्धाश्रमी रवानगी त्यांची

लाच,लुचपत,भ्रष्टाचार
चालला सर्वत्र सर्रास
पैशाविण न काम होई
पैशासाठी गहाण तत्वास

काळा बाजार पैशाचा
करती गब्बर,धुर्त,मुत्सद्दी
गरीब मरतो तत्वांसाठी
नाव न त्याचे कुणा ओठी

विकासाच्या योजना अनेक
गरीबांपर्यंत पोहचत नाही
चक्कर काटता कार्यालयाचे
हयात पूर्ण निघून जाई

सत्य,न्याय,नितीमत्ता
विकली जाते पैशापायी
अन्याय होतो गरीबावर
जाणीव कुणाला होत नाही

महागाईचा भस्मासूर
वाढतो आहे दिवसेंदिवस
गरजा पूर्ण करण्याशी
साधन गरीबा अपर्याप्त

सुलोचना लडवे, अमरावती

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles