भडीमार प्रश्नांचा;कुसुमलता दिलीप वाकडे

भडीमार प्रश्नांचापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आकाशात चांदण्या
का बरं लुकलुकतात ?
कुणी दिवे लावावयास
जात असावे का नभात

हत्ती बरे कुठली
पेस्ट वापरत असावे ?
एवढी लाकडे फोडून
दात पांढरे दिसावे

फुलपाखरांना कोण बरे
रंग लावीत असते ?
जणू काही त्याच्यांवर
ठिपके ब्रशनी शिंपडते

खरेच का कुणी इंद्रधनुत
सप्तरंगी रंग भरते ?
दिवाळीत आकाशदिवा
लावावे तसे दिसते

रस्त्यावर फिरताना बघून
फिरायला चालले का ?
माहित असूनही त्यांना
हा प्रश्न का विचारतात

असले प्रश्न नेहमीच
बरेच मला पडतात
घरची म्हणतात नको विचारू
ते आमचे डोके खाजवतात

कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी, जि.नागपूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles