सर्वांगीण विकासासह व्यक्तीमत्व घडवणारं ‘रुजवण’; सविता पाटील ठाकरे

सर्वांगीण विकासासह व्यक्तीमत्व घडवणारं ‘रुजवण’; सविता पाटील ठाकरेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण_

एप्रिल, मे महिन्याच्या तप्त उन्हाच्या झळांनी जमिनीचं अंग अंग भाजलं जातं. भेगा स्वतःचे अस्तित्व निर्माण करतात. परंतु, जून महिन्याच्या आरंभीच पावसाच्या सरीने जमीन नखशिखांत तृप्त होते. पुन्हा एक-दोन पाऊस पडले, की धरणी माता हळूहळू हिरवा शालू पांघरते, तिचं रूप खूप बदलत जातं, त्याला सौंदर्याची लकाकी प्राप्त होते. पावसाच्या आगमनाने जमिनीवर पडलेले बी रुजतं,अंकुरतं, हळूहळू बहरतं..!

होय रुजते…अर्थात रूजवण…! रूजवण मग ती जमिनीवर पडलेल्या बी चं असो, की सुनियोजित पद्धतीने आईने केलेल्या संस्कारांचं असो. वाढत्या वयाबरोबर रूजवण होतच; पण जर त्याला शिक्षणासारखे अधिष्ठान प्राप्त झालं असेल तर, व्यक्तीचा बौद्धिक, अध्यात्मिक, मानसिक, सामाजिक ,आर्थिक असा सर्वांगीण विकास होतो. एखादी गोष्ट किंवा एखादी अनुभूती झाल्यावर मनाच्या खोल कप्प्यात कधी ती रुजते हळूहळू फुलते आणि आपलं व्यक्तिमत्त्व घडविते.

निधड्या छातीने उणे तापमानात पण देशाचं रक्षण करणारे वीर जवान. त्यांच्या मनात देश प्रेमाची रूजवण झालेली असते. म्हणूनच, तर ते संकटाला अगदी वीरमरणाला सुद्धा हसत हसत सामोरे जातात. धर्म,जात, पात,पंथ यात विभागलेली ही भारत माता. “हिंदू मुस्लिम सिख ईसाई…
हम सब भाई भाई”, अभिमानाने म्हणतो ना आपण. कारण, धर्मनिरपेक्षतेचे बीज आपल्या मनात लहानपणापासून अगदी खोलवर रुजवण्यात आलेलं असतं. गेल्या अनेक वर्षापासून ‘मराठी भाषा’ सक्षमीकरणाचा यज्ञ ‘मराठीचे शिलेदार: समूहाने आरंभलेला आहे. अर्थात याची रूजवण समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी करून भाषा सक्षमीकरणाच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू केली.

सरांना त्यांच्या कामात अनेक अडचणी येतात. पण, या सर्वांवर मात करत त्यांचे काम चालू आहे. याचाच भाग म्हणून आज, ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेसाठी राहुल सरांनी रूजवण हा विषय देऊन सर्व कवी कवयित्रींच्या मनात विचारांचे बीज रोपलं. अर्थात ते रुजलं ,त्याची रुजवण झाली आणि अनेक कवितांच्या रूपानं याचे अंकुर आज पहावयास मिळाले. तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा….!!

सविता पाटील ठाकरे, सिलवासा
मुख्य परीक्षक, प्रशासक, लेखिका, कवयित्री
मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles