शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट आठ🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : फक्त घोषणा☄*
*🍂शनिवार : ०२ / डिसेंबर /२०२३*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*फक्त घोषणा*

बाजार भरला सत्तेचा
खेळ राजकीय नेत्यांचा
मते मिळण्याच्या आशेने
पाऊस पडे घोषणांचा

अरे राजकारण्यांनो
पुरेत फक्त घोषणा
आश्वासनांची पूर्तता
करण्यातच शहाणपणा

समजली हो जनतेला
नाटके घोषणाबाजीची
सत्तेसाठी वाजवता पुंगी
ही पोकळ आश्वासनांची

विकासाच्या घोषणा
निवडून येता विसरता
ठरवून मूर्ख जनतेला
तोंडाला पाने पुसता

जनहिताचे राजकारण
करा आता सर्वार्थाने
मिळवाल जनतेचा विश्वास
राहील पाठीशी ठामपणे

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*फक्त घोषणा*

नकोत नुसती आश्वासने
नकोच फक्त घोषणा
अंमलातही येऊ द्या की
तुमच्या सार्‍या योजना ||१||

घोषणाबाजी होते फक्त
प्रत्यक्ष काही होत नाही
जनता मात्र आशावादी
योजनांची वाट पाहत राही ||२||

घोषणाकारांनो जागृत व्हा
झाली जनता सुजाण
विचार करून थोडातरी
मग मागा मतदान ||३||

पुर्ती करणार असाल
तरच करा घोषणा
जनतेला विश्वासात घेऊन
कार्य करतो म्हणा ||४||

बोलण्यापेक्षा महत्त्वपूर्ण
असते ती फक्त कृती
विकास कामांची जनतेसमोर
ठेवा निश्चित प्रतिकृती ||५||

अन्यथा तुमच्या घोषणा
तुम्हालाच होवोत लखलाभ
नाहीच करणार जनता
तुम्हाला कधी माफ ||६||

जनतेच्या विकासासाठी
लढू आम्ही म्हणा
कृतीतून दाखवून द्या
तुम्ही दिलेल्या त्या घोषणा ||७||

कागदावरच्या घोषणा पहा
प्रत्यक्षात तुम्ही उतरवून
जनताही पाठीशी राहील
अगदी डोळे मिटून ||८||

गुन्हेगारी बेरोजगारी मिटविण्या
ठेवा तुम्ही थोडे समाजभान
देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी
घ्या आज नव्यानेच आण ||९||

*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप ता.कर्जत जि.रायगड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १०८ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे. कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*फक्त घोषणा*

निवडणूक जवळ येता
आम्हा नेत्यांना आठवते जनता
एकापेक्षा एक करुनी घोषणा
आमच्या शिवाय पर्याय नसे कोणता

वर्तमान सरकारने केलं काय
जनतेच्या हाती मिळालं काय
एकदा आम्हाला द्या निवडून
आमचं सरकार हाच एक उपाय

आम्ही जाणतो जनतेच्या भावना
विराजमान सरकार देई यातना
भरली आहे यांच्यात सारी लबाडी
आश्वासनाचा टाकतात खोटा दाणा

बसवून आम्हावर ईडीची चौकशी
सरकार मिळवत आहे शाब्बाशी
अरे आम्ही नाही घाबरत कुणाला
कारण जनता आहे आमच्या पाठीशी

आम्ही करत नाही फक्त घोषणा
राबवू प्रत्यक्षात सर्व योजना
मनापासून करू आम्ही जनसेवा
एकदा निवडून द्यावे हिच कामना

*कुशल गो डरंगे, अमरावती*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*फक्त घोषणा*

निवडणुका जाहीर होताच
कार्यकर्त्यांची सुरू होते रेलचेल
लक्ष सारे वेधून घेण्यासाठी
घोषणाबाजी देत गावभर फिरतील

पुन्हा पुन्हा हात जोडून
दारोदारी लाडीगोडी ते लावतील
आश्वासनाचा पाऊस पाडत
गल्लोगल्ली ते फिरतील

मतासाठी परिस्थिती कशी सुधारेल
यासाठी बढाई वर बढाई मारून घेतील
सगळ्यांच्या हाताला काम देऊ
याची खोटे स्वप्न दाखवतील

फक्त त्या खुर्चीच्या पाई
नवा गडी नवा डाव मांडतील
गाड्याचा धुराळा उडवत
जाती-पातीचे राजकारण करतील

आणि जर का निवडून येताच
मटन,चकना घेऊन गुलाल उधळत येतील
आश्वासनाच्या घोषणा देत देत
परत एकदा मिरवून घेतील

सत्तेची खुर्ची हातात मिळताच
फक्त घोषणा ह्या कागदापु्तीच ठेवतील
सामान्य जनतेशी काही घेणं देणं नाही
म्हणून पाच वर्षांसाठी गायप होतील

*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*फक्त घोषणा*

बधीर झाले कान माझे
ऐकून फक्त घोषणा..
विकास गेला खड्ड्यात
दररोज नुसती विवंचना

रस्ते सारे बंद जाहले
बोलण्याची नाही मुभा
शासनाचे हे नवे धोरण
न बोलताच रहावे उभा

द्रुष्टीहिन डोळस आम्ही
नवनवीन घोषणा ऐकतो
निवडणूकीचे वाहता वारे
प्रोपोगंड्याला उधाण येतो

वेळेनुसार बदलतंय सारे
अधुरे स्वप्न तू साकारतोय
हवंय प्रत्येकाला नवे बदल
राजकारणीच संधी शोधतोय

निर्लज्जपणाची हद्द जाहली
का लबाड प्रव्रुत्ती बाळगतो
लुळीपांगळी विकास योजना
खैरात फक्त घोषणांची देतो..!

*चंदू डोंगरवार अर्जुनी मोर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*फक्त घोषणा*

कधी योजना राबवली नाही थातुरमातूर
नारे करीते वादा
प्रचारसभेत नेते झोडी भाषणे
फक्त घोषणा करुन काय फायदा ॥

शंभर टक्के अनुदान दिले
सरकारचे पैसे हडप केले
कागदोपत्रीच व्यवहार मसूदा
फक्त घोषणा करून काय फायदा ॥

अंगी सेवेचे सामर्थ्य नसे
अंबलात आणतांना न दिसे
कोणीच सत्कार्याचा कायदा
फक्त घोषणा करून काय फायदा ॥

सरपंच उदासिन गाव भकास
ओसाड वाटा गोठाण मागास
नाक दाबोनी करी सत्ता निंदा
फक्त घोषणा करून काय फायदा ॥

निर्मळ ज्ञानगंगा केली अशुद्ध
अनितीने अनर्थ केले निर्बुद्ध
हटवले नाही अजुनी निर्बंधा
फक्त घोषणा करून काय फायदा ॥

गरीबांना वीज देणे घोषिले
अंधकारात खितपत ठेवले
राजकीय हस्तक्षेप वाढवी धंदा
फक्त घोषणा करून काय फायदा ॥

*प.सु. किन्हेकर*
*वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*फक्त घोषणा*

स्वार्थसाधू राजकारणी, मदमस्तीत आहे
शासन यंत्रणा, सारीच सुस्त आहे…

अस्मानी, सुलतानी, झेलून वार सारे
देशाचा पोशिंदा, विवंचनेत आहे

सुशिक्षित, बेरोजगार, पदवीधर
भविष्याच्या खोल गर्क चिंतेत आहे..

अन्याय, अत्याचार, पिळवणूक शोषण
गरीब जनतेच्या त्या ललाटात आहे..

जनतेच्या सोयी, सुविधा, देशविकास
कुलूपबंद, नेत्यांच्या भाषणात आहे..

देतात फक्त घोषणा, त्यातही पोकळपणा
ढोंग हा नेत्यांच्या नसानसात आहे..

*सौ. वनिता गभणे*
*आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*फक्त घोषणा*

घोषणा देण्याआधी त्याचा
विचार करावा सखोल
त्याची पाळीमुळे
रुजलेली असतात खोल

होते घोषणा जाहीर तेव्हा
मनी उठतात आनंदलहरी
भ्रमनिरास होताच अपेक्षांचा
घोर निराशा पडते पदरी

करावी पूर्तता घोषणांची
नकोत फक्त घोषणा
तेव्हाच तर अमलात
येई जनहिताच्या योजना

नका करू जनतेची निराशा
घोषणा करती पल्लवीत आशा
करावी त्यांची वेळीच कार्यवाही
तुमच्या शब्दाची ,कर्तृत्वाची
ती तर ठरते ग्वाही……….

*सौ स्नेहल संजय काळे*
*फलटण सातारा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles