मोबाईल – वरदान की शाप;पवन कुसुंदल,नांदेड

मोबाईल – वरदान की शापपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

हल्ली रस्त्यावरून प्रवास करताना एक बाब सातत्याने खटकते. ती म्हणजे, गाडी चालवताना नाहक मोबाईलचा होत असलेला वापर. आपण पाहतो छोट्यांपासून मोठ्यापर्यंत अनेकजण सर्रासपणे आलेले संदेश वाचत गाडी चालवणे,आलेला कॉल उचलून बोलत गाडी चालवणे,थोड्या थोड्या वेळाने उगीच मोबाईल काढून पाहणे हे नेहमीचे झाले आहे. सरकार कडून ठिकठिकाणी रस्त्यावर सुरक्षिततेबाबत पाट्या लावलेल्या असतात. परंतु,याकडे दुर्लक्ष करून अनेकजण गैरजबाबदारीने वाहन चालवताना दिसतात. सध्याच्या परिस्थितीत अपघातात होत असलेली प्रचंड वाढ यात मोबाईल हे सुद्धा मुख्य कारण असणे नाकारता येत नाही.
जीवन हे अनमोल आहे मग त्याचे महत्त्व आपणाला कळतं नाहीये का? असा प्रश्न काही दृश्ये पाहताना पडतो. एके ठिकाणी पाहिलेला किरकोळ अपघात ज्यात कानाला मोबाईल लाऊन आणि तिरकी मान करून फोनवर बोलत मोटरसायकल चालवणारा तरुण छोट्या रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येत असताना अचानक समोरून आलेले वाहन पाहून मोटरसायकल नियंत्रित न झाल्याने वळण्याऐवजी सरळ समोर जाऊन मोठ्या नाल्यात मोटरसायकल सहित पडला. बरं एवढ्यावर तो थांबला असता तर ठीक, परंतु त्यानंतर सुद्धा मोटरसायकल तशीच सोडून तो उठला आणि कपडे झटकत परत फोनवर बोलत उभा राहिला.सुदैवाने जास्त दुखापत झाली नव्हती परंतु विचार करण्यास भाग पाडणारे ते एकंदरीत दृश्य होते.

जीवाची पर्वा न करता असले कृत्य नेमके कशासाठी करतो हा विचार करायला हवा.मोबाईल हा आजच्या आधुनिक युगासाठी खूप महत्वाचा दुवा बनला आहे.जसे त्याचे फायदे तसेच त्याचे नुकसानही आहे. मोबाईलमुळे जीवन जगणे जरी सोपे झाले असले तरी फायद्यापेक्षा जास्त त्याचे नुकसान पाहायला मिळते. ऑनलाईन गेम आणि सोशियल ॲप वरून मैत्री होते आणि त्या फसव्या मैत्रीतून पुढे निराशा वाढून जीवन संपवलेले काही उदाहरण आहेत; तर मोबाईलचा गैरवापर करून फसवणूक झाल्याचे पण बरेचसे उदाहरण आपण पाहिलेले किंवा एकेलेले असतील.

कोणतेही ॲप इंस्टॉल करताना फोन गॅलरी,कॉल लॉग,मीडिया कंटेंट ,मेसेज बॉक्स ,कॅमेरा या सर्वांचा ॲक्सेस घेण्यासाठी अलाऊ आणि डेनाई असे ऑप्शन्स विचारले जातात आणि आपण स्वतः आपल्या संपूर्ण फोनचा ॲक्सेस त्या ॲपला देऊन टाकतो.आपण कधी विचार केला का आपण जे काही गूगलवर शोधत असतो त्या वस्तूंच्या बाबतीत फोनवर जाहिरात,कॉल्स आणि मेसेज येत राहतात.आपण दिलेल्या ॲक्सेसमुळे गुन्हेगार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सोशल साईट अथवा ॲप मधील फोटोवरचे चेहरे वापरून अश्लील फोटो आणि व्हिडिओज बनवले जातात व ते व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी केली जाते.महिलांनी प्रामुख्याने सोशल साईट वापरताना काळजी घ्यावी ,अनोळखी व्यक्ती किंवा समूह यांच्याकडून आलेली फ्रेंड रिक्वेस्ट टाळावी किंवा त्या व्यक्ती अथवा समूहाची योग्य शहानिशा करून मगच स्वीकारावी म्हणजे नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा अगोदर काळजी घेतलेली बरी. मोबाईलचा वापर कसा आणि किती करायचा हा वयक्तिक प्रश्न आहे यावर मर्यादा लावणे हा सुद्धा आपल्या परीने ठरवण्याचा भाग आहे. मोबाईल हा सदुपयोगी येणारा घटक म्हणून पाहण्याची गरज आहे.आपल्याला आलेला संदेश, व्हिडिओ, कुणाचे वक्तव्य ,एखाद्या घटनेचा वृतांत हे सर्व आपल्या ठिकाणी एकवेळ पडताळून मगच पुढे पाठवण्याची सवय लागली; तर समाजात निर्माण होणारी तेढ कमी करणे सहज शक्य होईल.

पवन कुसुंदल,नांदेड

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles