सहकार्यदायक शब्दबद्ध सुसंवाद;मनिषा सुतार

सहकार्यदायक शब्दबद्ध सुसंवादपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

संघटना व त्यामधील पद हे समाजातील स्थानाचे आणि प्रतिष्ठेचे पद आहे. असे ज्यांना वाटते त्यांना पुढे जर त्यांनी त्यांची खुर्ची सोडली की ते स्थान आणि ती प्रतिष्ठा नाहीशी होईल , पण अस होत नाही . कारण कुणी ते पद हे जबाबदारीचे आणि योगदानाचे आहे असे समजतात त्यांनी पद सोडले तरीही समाजात त्यांना मानाचे स्थान आणि प्रतिष्ठा मिळत राहते. जबाबदारी आणि योगदान ही पदाची महत्त्वाची अंगे आहेत. समाजातील स्थान आणि प्रतिष्ठा या जबाबदारी आणि योगदानाच्या पडछाया आहेत. साध्या भाषेत सांगायचे तर संघटनात्मक पदा मध्ये तीन कार्याचा समावेश होतो.

तुमची जबाबदारी काय आहे ओळखून त्या दिशेने पाऊले टाकणे. तुमची ताकद कोणती आहे ते ओळखणे; आणि तुम्ही स्वतः तुमची सर्वात महत्त्वाची ताकद आहात हे जाणून घेणे. त्या ताकदीने ती जबाबदारी पार करणे म्हणजेच त्या पदाचा मान सन्मान होय . संघटनात्मक यश चांगल्या निर्णयातून मिळते. चांगले निर्णय मात्र वाईट अनुभवानेच कसे घ्यावेत , याबाबत विचार सखोल करून घेतला जातो.जेव्हा एखाद निर्णय चुकीचा समजला जातो (चुकीने किंवा बरोबर) तेव्हा कोणीतरी तुमच्यावर ओरडतोच. याची अपेक्षा ठेवून ते सहन करायला हवे . शिस्तीचा आधार असलेले कार्य बळकटीकरणासाठी उपयुक्त होत . वेगवेगळी व्यक्ती एकत्र संघटीत होऊन काम करतात तेव्हा,एकसंधतेची भावना वाढीस लागते, आणि समाजहिताची मूल्ये जपली जातात.

फक्त पूर्वी काय झाल ह्यावर चर्चा करून श्रेयवादासाठी सृजनशीलतेचा ध्यास सोडता कामा नये . सुजनशीलता म्हणजेच नवीन्याचा ध्यास होय. त्या नव निर्माण विचाराला प्रोस्ताहन देण गरजेच असतं . तरच सामाजीक हीत , सामाजीक ऐक्य खऱ्या अर्थाने जोपासना करून समाजसेवा घडते हे सत्य आहे . पैशाचा वापर हा अल्पकाळ यशस्वी होतो, पण कालांतराने समस्या निर्माण करतो. त्याचप्रमाणे भीती आणि पैसा ते काम करीत नाहीत (जेव्हा दंडा आणि दाम हे मुख्य प्रेरक म्हणून आपण वापरणार नसतो) तेव्हा खालील तीन प्रेरक अत्यावश्यक, महत्त्वाचे ठरतात :
• आपुलकीची जाणीव,
• स्वत:विषयीच्या महत्त्वाची जाणीव,
• स्वत:च्या विकासाची जाणीव.
या मार्गाने आपण लोकांना आपल्याबरोबर काम करायला कार्यप्रवण करू शकतो. प्रेरणा आणि नवनिर्माण यांद्वारे एकात्मता बळाच्या संभाव्य सामर्थ्याला चालना देऊन सुसंघटित व सुसज्ज करून समाजकल्याणाच ध्येय गाठू हे नक्कीच. त्यासाठी ध्येयधोरण निश्चिती महत्वाची असते. श्रेय एखाद्या चलनी नोटेसारखे समजतात. परंतु, श्रेय हे बरेचसे ज्ञानासारखे असते-ते देण्याने कुणी ते गमावित नाही. उलट ते वाढत जाते. मत्सराची भावना कमी करण्यासाठी श्रेयाची वाटणी करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे ‘हे विश्वची माझे घर’ म्हणताच सकारत्मक विचार मनी उमटतो.

मनिषा सुतार
पिंपरी चिंचवड, पुणे
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles