अनंत आमुची ध्येयासक्ती;अनिता व्यवहारे

अनंत आमुची ध्येयासक्तीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जाने वालो जरा मुड के देखो मुझे
एक इन्सान हू मै तुम्हारी तरह!
जिसने सब को रचा अपने हे रूप से
उसकी पहचान हू मै तुम्हारी तरह!

आज सकाळी हे गाणे ऐकले आणि माझ्या डोळ्यासमोर माझी एक मैत्रीण उभी राहिली. आम्ही दोघी बी एडला एकाच वर्गात शिकत होतो. तिला हे गाणं खूप आवडायचं. आणि ती नेहमी गुणगुणायची. मी जेव्हा तिला विचारलं होतं, तेव्हा ती म्हणाली, ‘अगं या गाण्याचा आणि माझं खूप जवळचा संबंध आहे. मला मात्र तेव्हा काहीच कळलं नाही.. मी तिला पुन्हा पुन्हा विचारले तेव्हा ती म्हणाली, हे गाणं माझ्या छोट्या बहिणीसाठी माझ्या नेहमी ओठी यायचं. आता माझी बहीण राहिली नाही. पण ते गाणं मात्र मनात घर करून गेले.

त्याचं असं झालं माझ्या पाठच्या बहिणीच्या वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षी तिला अपंगत्व आलं. तिचे दोन्ही पाय निकामी झाले. काय? कसे? मला माहीत नाही आणि तेव्हापासून तिला चालता येईना… चालणं बंद….पुढे शाळा बंद…..हळूहळू घरच्यांकडून मिळणार प्रेम ही बंद झालं. पोटची पोरगी असूनही माझे आई-वडील तिचा दुस्वास करू लागले. अर्थात त्यांनी खर्चही खूप केला. उपचारही केले. पण त्यासाठीचे जे सोपस्कार होते ते करायला त्यांनी वेळ दिला नाही. अर्थात प्रयत्नांती… परमेश्वर… असं घडलं असतं… सुधारली असती ती. यदा कदाचित काहीतरी चमत्कार घडला ही असता पण… आणि अखेर मनात घर करून राहिलेला न्यूनगंड, आई-वडील नातेवाईक बहिण भाऊ यांच्या कडून होणारी अवहेलना यामुळे मनाचे खच्चीकरण झाले. आणि ती हे जग सोडून गेली.

मी मात्र तिच्यावर खूप प्रेम केलं. तिला जीवही लावला,, सेवाही केली पण मी एकटी काय करणार? आणि तेव्हापासून या गाण्यातल्या बोला प्रमाणे जर तिच्याकडे कुणी लक्ष दिलं असतं तर आज ती माझ्याबरोबर असती… असं वाटू लागलं… आज मला त्या दोघींची आठवण झाली. कारण आज मी आत्ता हे गाणं ऐकलं. आज ‘जागतिक दिव्यांग दिन’ हे रेडिओवाले खास दिनाचे औचित्य साधून अशी गीत लावतात… पण हे गीत दिव्यांगासाठी नक्कीच सार्थ आहे. आपण तर अशा दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती प्रेम दिलं तर, नक्की त्यांच्यातील शारीरिक दिव्यंगत्व ते विसरतील.

‘अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा’. 1992 सालापासून आपल्याकडे राष्ट्रीय संयुक्त संघटना आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त सहकार्याने 3 डिसेंबर 1992 हा दिवस जागतिक दिव्यांग दिन पाळण्याचे घोषित करण्यात आले. याचे कारण म्हणजे दिव्यांगा बद्दल सामान्य जनतेच्या मनात जनजागृती व्हावी. या हेतू बरोबरच त्यांना समाजात एक स्थान प्राप्त व्हावं. 1959 साली बेल्जियम मधील सर्वात मोठ्या कोळशाच्या खाणी ला भीषण अपघात झाला. त्यात जसे हजारो जण मृत्युमुखी पडले तसे त्याच्या अधिक पटींनी जखमीही झाले. कुणाचा हात, कुणाचा पाय गेला. कुणाला अंधत्व, कुणाला कर्णबधिर त्व, तर कोणाची वाचा गेली. पण शासनाने याकडे दुर्लक्ष केले.. अर्थात मृतांच्या नातेवाईकांना मदत केली पण.. जे कायमचे अधू झाले त्यांच्यासाठी मात्र यासाठी शासनाने कोणतीही ठोस मदत दिली नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकात संतापाची लाट पसरली. त्यांनी आंदोलने केली. पुढे हा संघर्ष असाच चालू राहिला. नंतर संयुक्त राष्ट्र संघटनेनं मार्च महिन्याच्या तिसऱ्या रविवारी जागतिक दिव्यांग दिन पाळण्याचे ठरवले आणि शेवटी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने प्रत्येक वर्षी तीन डिसेंबर हा दिवस ‘जागतिक दिव्यांग दिन’ म्हणून पाळला जाऊ लागला.

अनिता व्यवहारे
श्रीरामपूर, जि अहमदनगर
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles