अधिवेशनाचा पाढा म्हणजेच सरकारी राडा”; स्वाती मराडे

अधिवेशनाचा पाढा म्हणजेच सरकारी राडा”; स्वाती मराडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सरकार कुणाचेही असो, चहापानावर बहिष्कार,
ही तर आमची परंपरा, करत रहायचे शाब्दिक वार..”

अधिवेशन म्हटलं की, आदल्या दिवशी चहापानाचा कार्यक्रम परंपरेने चालत आलेला, हेतू हा की अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी व विरोधक यांच्यात काही चर्चा व्हावी. पण प्रत्येक वर्षी विरोधी पक्षाचा चहापानावर बहिष्कार असतोच असतो. जणू हीच एक परंपरा झाली आहे. काल मात्र यावर चहापानाऐवजी पुढील वेळी ‘सुपारीपान’ घेऊ असाही तोडगा ऐकायला मिळाला‌. चर्चेसाठी बोलवायचंच, आम्हीही विडा उचललाय चहाऐवजी कार्यक्रम आता, सुपारीपानाचा ठरलाय..!

विरोधक आणि सत्ताधारी
दोघांत एक समान धागा आहे
लोकशाहीचे आम्हीच पाईक
असा उगाच त्रागा आहे..
पावसाळी असो की हिवाळी
अधिवेशन वादळीच झाले पाहिजे
सरकारी राडा करूनच मग
बातम्या बातम्यात गाजले पाहिजे…

कुणी कुणाला कोणत्या मुद्यावर कसे कोंडीत पकडायचे याचा अभ्यास आधीच झालेला असतो‌. शाब्दिक आक्रमण वाढता वाढता वाढे, त्याप्रमाणे वाढतच जाते आणि विरोधाला विरोध, उत्तराला प्रतिउत्तर करण्याच्या नादात अनेकजण हमरीतुमरीवरही येतात. भरलेल्या वर्गात जणू धुडगूस सुरू होतो अन् कसली चर्चा नि कसलं काय गोंधळातच अनेक ठराव पास होतात व अधिवेशनाचा गाशा गुंडाळला जातो. हाच राडा दरवर्षी अनुभवला जातो.

“प्रश्नोत्तराच्या तासाला
हिशोबाचा कागदी घोडा आहे,
गोंधळ एके गोंधळ घालायचा
असा सरकारी राडा आहे…”

नागपूर येथील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आलेला आजचा चित्र चारोळीचा विषय. विधानसभा असो, की लोकसभा या दोन्ही सर्वोच्च सभागृहाचे पावित्र्य धुळीला मिळवत राजदंड पळवून धक्काबुक्की करण्यापर्यंत आमदार खासदार या लोकप्रतिनिधींची मजल जाताना आपण दूरदर्शनवर अनेकदा पाहतो.. राष्ट्र आणि जनतेचे प्रश्नांऐवजी आपापसातील पक्षीय कुरघोडीने राजकारणातील समाजकारण संपून राडाच ऐरणीवर येतो. सत्ताधारी आणि विरोधक यामध्ये कुठेही वैचारीक साम्य दिसत नाही. हेच तर लोकशाहीचे दुर्दैव म्हणावे लागेल. हेच नेमकेपणाने टिपण्याचा आपणा सर्वांचा प्रयत्न यातून दिसून आला. वास्तव मार्मिकपणे शब्दबद्ध झाले. सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन..!!!

स्वाती मराडे, पुणे
मुख्य परीक्षक,सहप्रशासक,कवयित्री,लेखिका

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles