“राष्ट्रीय सेवा योजना विभाग नेतृत्व कौशल्य विकसित करण्याचे उत्कृष्ट माध्यम”; ॲड. गौतम पाटील

“राष्ट्रीय सेवा योजना विभाग नेतृत्व कौशल्य विकसित करण्याचे उत्कृष्ट माध्यम”; ॲड. गौतम पाटील



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अलीबाग प्रतिनिधी, तुषार थळे

अलिबाग: येथील जे. एस. एम. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन प्रसंगी ऍड. गौतम पाटील यांनी प्रतिपादन केले की, राष्ट्रीय सेवा योजना विभाग नेतृत्व कौशल्य विकसित करण्याचे उत्कृष्ट माध्यम आहे.

श्रमसंस्कार शिबिराच्या उदघाटन प्रसंगी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, ग्रुप ग्रामपंचायत मान तर्फे झिराड च्या सरपंच सौ. अस्मिता म्हात्रे, उपसरपंच राकेश पाटील, रायगड जिल्हा समन्वयक प्रा. तुळसीदास मोकल, प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, डॉ. पंकज घरत, प्रा. अश्विनी आठवले, प्रा. सचिन भोस्तेकर व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक उपस्थित होते.

प्रा. तुळसीदास मोकल यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, विद्यार्थ्यांनी या शिबिराच्या माध्यमातून स्वयंशिस्त, श्रमसंस्कार व व्यक्तिमत्व विकास साधावा. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, ॲड. गौतम पाटील यांनी सांगितले कि, राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबीर हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे माध्यम आहे. विदयार्थ्यांनी बौद्धिक सत्रातून ज्ञानार्जन करावे तसेच सामाजिक कार्यात हातभार लावावा असे आव्हान ॲड. गौतम पाटील यांनी केले.

डॉ. साक्षी पाटील यांनी श्रमसंस्कार शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. सोनाली पाटील म्हणाल्या कि, राष्ट्रीय सेवा योजना विभाग हे विदयार्थी घडविण्याचे व्यासपीठ आहे या शिबिरातून विद्यार्थ्यांना श्रमदानाचे महत्व तसेच सामाजिक समस्या समजण्यासाठी मदत होते. सरपंच सौ. अस्मिता म्हात्रे यांनी शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या व सर्वोतपरी सहकार्य करु असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रविण गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. अश्विनी आठवले यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles