दर्यावर्दी जीवन म्हणजे सहनशक्तीची नित्य कठोर कसोटीच’; तारका रूखमोडे

‘दर्यावर्दी जीवन म्हणजे सहनशक्तीची नित्य कठोर कसोटीच’; तारका रूखमोडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शुक्रवारीय हायकू काव्यपरीक्षण

कधी गहन शांत..कधी अवखळ बेभान..कधी सौंदर्य दाखवतो अलवार..कधी धोक्याची टांगती तलवार..कधी टाकतो अमापतेचे दान..कधी हिसकून घेतो क्षणात प्राण..असा त्याचा लहरी स्वभाव..किती असंख्य त्याची रूपे..कधी भेसूर तर कधी अनूप. कोळी बांधव त्याच्या स्वभावाशी परिचित असूनही, वितभर पोटासाठी नानाविध प्रतिकूलतेला झुंज देत ‘तारू’ त्यात त्यांना वल्हवावाच लागतो. ते परततील की नाही याची शाश्वती नसतानाही. तसंच नाविक दळ व वादळ यांचाही रोजचाच संबंध. तटरक्षकरुपी ‘या सागरावरील दर्यावर्दी जीवन म्हणजे सहनशक्तीची नित्य कठोर कसोटीच’ व त्यांचं जग म्हणजे प्रतिक्षणाला मृत्यूचं आव्हानच जणू.!

नौदल नौका
बचाव अभियान
साहसी शान

होय..या आव्हानाचं ते थरार रूप आठवतं अजूनही. सोमनाथ येथील चार डिसेंबरची ती भयावह काळरात्र. पोटासाठी मासेमारीसाठी गेलेली ती बोट वादळाच्या गर्तेत फसली.त्यातील कोळी बांधव मृत्यूशी झुंज देत असल्याचे दिसताच भारतीय नौसेनेने तटरक्षक टीम तात्काळ पाठवली.120 प्रतितासाच्या वाऱ्याच्या भयानक वेगाला प्रतिसारत जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न ही रेस्क्यू टीम करत होती. डुबलेल्या तारू सोबत ह्यांचही जहाज मृत्यूच्या जबड्यात जाण्यासाठी हेलकावे खात होतं. सतत आठ तास वादळांचा ओघात,किर्र काळोखात एक किमी.चं काहीच दिसत नसताना,मृत्यू जवळ होता तरीही जीवाची पर्वा न करता मच्छीमारांना वाचवण्यासाठी या कोस्ट गार्डस् ने प्राणांची बाजी लावली,आशा सोडली नाही. स्वतःला धीर देत लढले. कोळ्यांच्या डोळ्यातील उजेड मावळत चालला होता; पण आशावाद त्यांनीही सोडला नव्हता.शेवटी सर्वांचे प्राण वाचले व बाहेर आलेत.

त्या प्रसंगाचं रेस्क्यू ऑपरेशनला निघालेल्या नावेचं चित्र आज आ. राहुल सरांनी दिलेलं.आज शिलेदारांच्या लेखणीने अदम्य नाविक दळ साहसाची भारतीय वीरगाथा रेखाटावी व बोटीरुपी आयुष्याचे साहसी अंतरंग लेखणीतून उलगडावे. हिंमत व साहसाचीच आज देशाला गरज यासाठी कदाचित हे चित्र सरांनी दिलेलं..सहभागी साहित्यिकांचे हार्दिक अभिनंदन..!

थोडसं मनातलं..

जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरीही, हिंमत, आशावाद कधीच सोडायचा नाही.सामना करायचा.चित्राचं सूक्ष्म निरीक्षण करून जे दिसतं त्याच्या अंतरंगात जाऊन आशयघन कलाटणी देण्याचा प्रयत्न करूया.तोच हायकूचा आत्मा आहे.असेच लिहिते व्हा..!!

प्रा.तारका रूखमोडे, गोंदिया
मुख्य परीक्षक,सहप्रशासक, लेखिका

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles